महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

MLA Sudhir Tambe Suspension : आमदार सुधीर तांबेंची काँग्रेसमधून हकालपट्टी; तांबे म्हणाले, भूमिका न्यायाला धरुन नाही...

आमदार सुधीर तांबे यांना काँग्रेसने पक्षातून निलंबित केले आहे. पदवीधर मतदार संघात नाशिक विभागातून काँग्रेसचे डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, त्यांना उमेदवारी मिळालेली असाताना त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल न करता त्यांचे चिरंजीव सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. हे सगळे अचानक झाल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. त्या पार्श्वभूमीवर आता ठाकरे गटाने सावधगिरीची भूमिका घेत मातोश्रीवर बैठक घेतली होती. यामध्ये संजय राऊत यांनी ही निवडणूक बिनविरोध होणार नाही. सत्यजित तांबे यांना आव्हान दिले जाईल असे म्हटले होते.

MLA Sudhir Tambe Suspension
MLA Sudhir Tambe Suspension

By

Published : Jan 15, 2023, 7:04 PM IST

Updated : Jan 15, 2023, 10:15 PM IST

मुंबई -काँग्रेसचे कट्टर समर्थक समजले जाणारे सुधीर तांबे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे त्यांना काॅग्रेसने निलंबीत केले आहे. पदवीधर निवडणुकीत काँग्रेसने सुधीर तांबे यांना तिकीट दिले होते. मात्र सुधीर तांबे यांनी पुत्र सत्यजित तांबे यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. असंतुष्ट नाना पटोले यांनी दिल्ली काँग्रेसच्या नेत्याकडे तक्रार केली होती. त्यामुळे सुधीर तांबे यांच्यावर काँग्रेसकडून शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे.

काँग्रेसकडून निलंबनाची कारवाई -नाशिक पदवीधर मतदार संघातून काँग्रेसचे अधिकृत उमेदवारी हे सुधीर तांबे यांना दिली होती. मात्र शेवटच्या क्षणी सुधीर तांबे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला नाही. मात्र सुधीर तांबे यांचे पुत्र सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून नाशिक पदवीधर मतदार संघातून उमेदवारी अर्ज भरला. यामुळे काँग्रेसची चांगलीच नाचक्की झाली. मात्र आता यानंतर काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने या सर्व बाबीत लक्ष घालत गंभीर दखल घेतली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुधीर तांबे यांच्यावर काँग्रेसकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी हायकमांडला यासंदर्भातील अहवाल पाठविला होता. त्यानंतर शिस्तपालन समितीची ही कारवाई करण्यात आली आहे. काँग्रेसचे कार्यकारणी कमिटीचे सेक्रेटरी तारीख अन्वर यांनी सुधीर तांबे यांच्या निलंबनाचे पत्र जाहीर केल आहे. तसेच या सर्व बाबतीत पक्षाकडून गंभीर दखल घेतली गेली असून सुधीर तांबे यांची पक्षांतर्गत चौकशी केली जाईल असे आदेश या पत्रातून देण्यात आले आहेत.

अपक्ष उमेदवारी अर्ज भरला - होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या पाच पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी होणाऱ्या निवडणुकीत नाशिक पदवीधर मतदारसंघाची जागा महाविकास आघाडीत काँग्रेसकडे आली होती. या जागेसाठी काँग्रेसने अधिकृत उमेदवारी सुधीर तांबे यांना दिली. मात्र गेल्या अनेक महिन्यापासून या जागेवर आपल्याला तिकीट मिळावे यासाठी सुधीर तांबे यांचे पुत्र सत्यजित तांबे हे प्रयत्न करत होते. सत्यजित तांबे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे देखील आहेत. मात्र तांबे कुटुंबीयांनी पक्षाचा आदेश धुडकवत, अपक्ष उमेदवारी म्हणून सत्यजित तांबे यांचा उमेदवारी अर्ज भरला. यामुळे काँग्रेसचे अधिकृत उमेदवारच आता नाशिक पदवीधर मतदारसंघात नसल्याने चारही बाजूने काँग्रेसची राजकीय कोंडी होताना पाहिला मिळतेय. त्यामुळेच या सर्व घटनेची गंभीर दखल काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाने घेतली आहे.

योग्य ते उत्तर देऊ - केंद्रीय नेतृत्वाकडून आपल्यावर केलेल्या कारवाईबाबत अद्याप तरी आपण काही बोलणार नाही. मात्र आपल्याकडे याबाबत केंद्रीय पक्ष नेतृत्वाने विचारणा केल्यास याबाबत आपण योग्य ते उत्तर देऊ असे स्पष्टीकरण सुधीर तांबे यांच्याकडून देण्यात आल आहे. तांबे कुटुंबीय हे काँग्रेसच्या अत्यंत निष्ठावान कुटुंबांपैकी एक आहे. त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाचं पक्ष आदेश धुडकावत सत्यजित तांबे यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज नेमका का भरला? याबाबत आता पक्षाकडून सुधीर तांबे यांच्याकडे विचारणा केली जाणार आहे. मात्र या सोबतच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांना देखील या सर्व प्रकरणात पक्षाकडून विचारणा केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

भाजपचा छुपा पाठिंबा? - राज्याच्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत नाशिकच्या उमेदवारीवरून चांगलाच गोंधळ उडालेला आहे. काँग्रेस पक्षाने डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यांना वेळेआधीच ए.बी फॉर्म दिला गेला होता. मात्र, त्यांनी वेळेत तो फॉर्म दाखल केला नाही. दरम्यान, त्यांचे चिरंजीव सत्यजित तांबे हे अपक्ष म्हणून नाशिकच्या पदवीधर मतदारसंघांमध्ये उभे राहिले आहेत. दरम्यान, यामध्ये सत्यजीत तांबे हे भाजपचा छुपा पाठिंबा घेत असल्याचा तर्क लावला जात आहे. काही दिवसांपूर्वी सत्यजीत यांच्या पुस्तक प्रकाशनाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले असता त्यानी तांबे यांची चांगलीच स्तुती केली होती. त्या कार्यक्रमाचा संदर्भ देत भाजप पाठिंब्याची शंका राजकीय वर्तुळात बळावली आहे असे चित्र आहे. दरम्यान, आज झालेल्या बैठकित ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी सत्यजित तांबे यांना नाही तर शुभांगी पाटील याना पाठिंबा आहे असे जाहीर करत नवा संघर्ष उभा केला आहे.

निवडणूक बिनविरोध होणार नाही : नाशिक पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी मिळूनही काँग्रेस नेते डॉ. सुधीर तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही. या उलट त्यांचे चिरंजीव सत्यजीत तांबे यांनी उमेदवारी अर्ज भरल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे सत्यजीत तांबे यांना भाजपची फूस असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे नाशिक पदवीधरची निवडणूक एकतर्फी होण्याची वा बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. नाशिक पदवीधरची निवडणूक बिनविरोध होणार नाही, असं संजय राऊत यांनी ठणकावलं आहे. त्यामुळे नाशिक पदवीधर निवडणुकीत शिवसेना मोठा डाव टाकण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. त्याचे संकेत देखील संजय राऊत यांनी आज माध्यमांसोबत बोलताना दिले.

भारतीय जनता पक्षाचे घर फुटेल तेव्हा त्यांना कळेल : खरे तर काँग्रेसच्या वरिष्ठांनी सुधीर तांबे यांचं नाव पदवीधर मतदार संघा करिता निश्चित केलं होतं त्यामुळे नाशिक मधून दुसरे कोणी काँग्रेसच्या वतीने अर्ज भरण्याचा प्रश्न नव्हता मात्र सत्यजित तांबे यांनी भाजपचा छुपा पाठिंबा मिळवण्यासाठी निवडणुकीच्या आधीच काही तयारी केल्याची बाप समोर आली आणि त्यामुळेच मोठा गदारो देखील झाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाठवले यांनी देखील खुलासा केलाच होता की सत्यजित तांबे हे काँग्रेसचे उमेदवार नाहीत त्यांच्या उमेदवारीबाबत त्यांनी काँग्रेसला बिलकुल कळवलेलं नाही त्यामुळे ते अपक्ष उमेदवार आहेत. तसेच, भारतीय जनता पक्ष आज प्रत्येकाचे घर पडत आहे. मात्र, येत्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाचे घर फुटेल तेव्हा त्यांना खरेच दुःख काय आहे ते समजू शकेल.

दगाफाटा होऊ शकतो : या सर्व पार्श्वभूमीवर शुभांगी पाटील ह्या पदवीधर मतदार संघामध्ये शिवसेनेच्या पाठिंबाने या निवडणुकीमध्ये रंगत आणणार आहेत. संजय राऊत यांनी पुढे म्हटले कि, पदवीधर निवडणुकीत काही दगाफाटा होऊ शकतो. म्हणून काँग्रेस कडून योग्य समन्वय असायला हवा होता. मात्र संजय राऊत यांनी सांगितले, कि सुधीर तांबे यांनी ए बी अर्ज मिळून देखील त्यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही . त्यासाठी काँग्रेस पक्षाला दोष देता येणार नाही . ह्या बाबत मविआ एकमताने निर्णय घेणार आहोत. कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक बिनविरोध होणार नाही.

वेगाने घडामोडी घडणार : संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले असल्याने तसेच शुभांगी पाटील तडक मातोश्रीवर उठाव ठाकरे यांच्या भेटीला निघाल्या त्यामुळेच जी निवडणूक बिनविरोध म्हणून होणार होती. आता मात्र शुभांगी पाटील यांच्या उमेदवारीमुळे रंगतदार ठरणार आहे. त्यामुळेच भाजपच्या छुप्या पाठिंब्यावर उभे राहणाऱ्या सत्यजित तांबे यांना जड जाणार हे मात्र नक्की . त्यामुळेच नाशिकमध्ये वेगाने घडामोडी घडणार त्या काही शंका नाही.

Last Updated : Jan 15, 2023, 10:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details