मुंबई : राज्यात पाऊस व नापिकी कर्ज अशा विविध कारणांमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची दखल (farmers suicides due to rain and barren debt) घ्या. तसेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांनी युद्ध पातळीवर दखल घ्या. केवळ रकमेची तरतूद करून भागत नाही, त्यापेक्षा अधिक काहीतरी शेतकऱ्यांना दिलं पाहिजे. तसेच विभागीय, जिल्हा पातळीवर मंत्री आणि अधिकाऱ्यांनी बैठका घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या समजून घ्या, असे आवाहन नीलम गोऱ्हे यांनी(Neelam Gorhe on farmers suicides) केले.
राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या :राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. हे प्रमाण गेल्या काही महिन्यांमध्ये वाढले असल्याची नोंद राष्ट्रीय गुन्हे संबंधीच्या ताज्या अहवालामध्ये घेतली गेली आहे. या पार्श्वभूमीवर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी राज्याचे मुख्य सचिव आणि मुख्यमंत्री यांचे लक्ष वेधलेले आहे. राज्यात अतिवृष्टीमुळे अमरावती जिल्ह्यामध्ये सोयाबीन व कापूस पिकाचे अत्याधिक नुकसान दिसून आले आहे. या कारणाने मागील काही दिवसात अमरावतीमध्ये दहा तर जिल्ह्यात तीनपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या (farmers suicides in state) केलेल्या आहेत.
परतीच्या पावसाचा फटका :परतीच्या पावसाचा सर्वांत जास्त फटका बसल्याने विदर्भात अधिक आत्महत्या झाल्याचे समजते. तसेच औरंगाबाद जिल्ह्यात 20 ऑक्टोबरच्या पहाटे तुफान पावसामुळे शेतीचे नुकसान झालेले आहे. या अनुषंगाने विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Legislative Council Deputy Speaker Neelam Gorhe) यांनी मुख्य सचिवांना निवेदनाद्वारे तातडीने उपाययोजना करण्यास अनेक मुद्द्यावर सविस्तर निर्देश दिले आहेत. 19 ऑक्टोबर रोजी रात्री औरंगाबाद जिल्ह्यात भरपूर पाऊस पडल्यामुळे शेतातच पाणी साचले. नापिकीमुळे शेतकऱ्यांचे पीक गेले. याच पद्धतीने विदर्भातील मराठवाड्यातील राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये खासकरून अमरावती या जिल्ह्यामध्ये नापीकेमुळे, जास्त पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले. तर काही ठिकाणी कर्जाच्या ओझ्यामुळे शेतकरी दबले गेलेले आहेत. तसेच शेतकऱ्यांना वेळेवर कोणती आर्थिक तरतूद मिळत नाही. या सर्व पार्श्वभूमीचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढ होत असल्याचे दिसून येते.