मुंबई -सातत्याने एखाद्या विरोधात जर खोटे आरोप होत राहिले, तर त्याचा संयम सुटणे शक्य आहे. सत्तार यांच्या वक्तव्याचे समर्थन ( Sattar statement is not supported ) नाही मात्र, वस्तूस्थिती ही समजून घेतली पाहिजे अशी प्रतिक्रिया बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते विजय शिवतारे ( Shiv Sena spokesperson Vijay Shivtare ) यांनी व्यक्त केली आहे.
Vijay Shivtare : सतत डिवचल्यानंतर जनावरही उसळतात अन् 'ते' तर आमदार - विजय शिवतारे - कृषीमंत्री अब्दुल सत्तार
एकाद्याला सतत डीवचल्याबद्दल त्याचा संयम सुटणे मान्य असल्याचे मत विजय शिवतारे यांनी ( Shiv Sena spokesperson Vijay Shivtare ) व्यक्त केले आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार ( Agriculture Minister Abdul Sattar ) यांनी केलेले वक्तव्याचे मी समर्थन ( Sattar statement is not supported ) करत नाही परंतू, आमच्यावर सतत खोके घेतल्याचा आरोप होत असल्याचे शिवतारे म्हणाले.
'ते' तर आमदार -मंत्री अब्दुल सत्तार ( Agriculture Minister Abdul Sattar ) यांनी केलेल्या वक्तव्याचे आपण कुठेही समर्थन करत नाही, मात्र, असे का घडले याचाही विचार करणे आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीच्या विरोधात जर सातत्याने कुणी खोटा प्रचार करत असेल आरोप करत असेल तर ते किती काळ सहन करणार. एखाद्या जनावराला जर आपण सतत टोचत राहिलो तर ते सुद्धा उसळून अंगावर येते. हे तर मंत्री आमदार आहेत अशा शब्दात विजय शिवतारे यांनी आमदार, मंत्र्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
कायदेशीर तक्रार दोन दिवसात दाखल -आदित्य ठाकरे,( Aditya Thackeray ) सुप्रिया सुळे यांनी सातत्याने पन्नास खोके असा प्रचार सुरू केला आहे. आमदारांनी 50 खोके घेतल्याचा खोटा प्रचार सुरू असून यासंदर्भात आपण आता आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे यांच्या विरोधात बदनामी केल्याबद्दल कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू करत आहोत. एका दोन दिवसात त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल अशी माहिती शिवतारे ( Vijay Shivtare ) यांनी दिली.