मुंबई -पर्यावरणाच्या संवर्धनासाठी आणि ऊर्जा बचतीसाठी मध्य रेल्वेकडून उपनगरीय मार्गावर 102 रेल्वे स्थानकांवर शंभर टक्के विद्युत एलईडी दिवे बसवलेले आहे. यामुळे मध्य रेल्वेला वार्षिक 9 लाख 12 हजार विजेच्या युनिट्ससह 1 कोटी 10 लाख रुपयांची बचत होणार आहे.
एलईडी दिव्यामुळे 7.59 कोटींची बचत
मध्य रेल्वेकडून मागील काही वर्षांपासून ऊर्जा बचत, ऊर्जा संवर्धनासाठी प्रयत्न सुरू आहे. कमी विजेचा वापर करून जास्तीत जास्त स्वच्छ प्रकाश देण्यावर मध्य रेल्वेकडून प्रयत्न केला जात आहे. होता मध्य रेल्वेच्या मार्गावर असलेले, 432 रेल्वे स्थानकांवर 57 हजार 552 एलईडी दिवे तर 2 हजार 650 रेल्वे निवासी कॉटर कार्यशाळा आणि इतर कार्यालयांमध्ये 81 हजार 766 एलईडी दिवे बसविण्यात आलेले आहे. यात मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूर आणि भुसावळ या विभागाचा समावेश आहे. दरवर्षी मध्य रेल्वेचे एलईडी दिव्यामुळे 7 कोटी 59 लाख रुपयांची बचत होत आहे.