मुंबई - दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाला विरोधी पक्षनेत्यांना निमंत्रण न दिल्यावरून प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. 'सरकारने कोरोनाचे कारण पुढे करत विरोधकांना या कार्यक्रमासाठी आमंत्रण दिले नाही.' अशी टिका त्यांनी केली आहे.
..'म्हणून सरकारची बोलावण्याची इच्छा नाही'
प्रवीण दरेकर माध्यमांशी बोलतांना म्हणाले की, 'विरोधकांना भूमिपूजन सोहळ्याला बोलवायला हवं होतं बाळासाहेबांच्या पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी सर्वपक्षीय नेत्यांना बोलावणे गरजेचे आहे. बाळासाहेब हे शिवसेनेचे प्रमुख असले तरी राजकारणाच्या पलीकडे महाराष्ट्रातील जनतेने त्यांच्याकडे पाहिलं आहे. बाळासाहेबांसारख्या लोकप्रिय नेतृत्व असलेल्या नेत्याच्या स्मारकाच्या कार्यक्रमाला सर्वांना बोलावलं गेलं असतं, तर कार्यक्रमाची उंची वाढली असती. राज्य सरकारने कोव्हिडचे कारण पुढे करत हे कार्यक्रम ऑनलाईन केले आहे. मात्र वेगवेगळ्या कार्यक्रमांना राज्य सरकार परवानगी देत असते. पण या कार्यक्रमाला बोलण्याची इच्छा नसेल तर कोरोना किंवा अशी अनेक कारणे राज्य सरकारने विरोधी पक्षांना दिलेली आहे.' अशी टीका दरेकर यांनी केली आहे.