नवी मुंबई; वाहतूक शाखेच्या 'रस्ता सुरक्षा अभियाना'त न्यायव्यवस्था सहभागी - ......
कोणती घटना घडून गेल्यावर प्रकरण न्यायालयात जाते तेव्हा सगळं काही संपलेलं असतं. कोणाच्या तरी घरातील बळी गेलेला असतो. त्यामुळे आपण काही करू शकत नाही हे दुःख नेहमीच आमच्या मनात सलत होत. त्यामुळे आम्ही या अभियानात सहभागी होऊन जनजागृती करण्यासाठी रस्त्यावर उतरलो असे न्यायाधीश तृप्ती देसाई नाईक म्हणाल्या.
वाहतूक शाखेच्या 'रस्ता सुरक्षा अभियाना'त वकिलांचा सहभाग
नवी मुंबई-वाहतूक शाखेकडून ३२वे रस्ता सुरक्षा अभियानाद्वारे 'वन डे विथ पोलीस' उपक्रम राबवण्यात येत आहे. या अभियानात वकिलांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. यावेळी नियम पाळणाऱ्या चालकांना वकिलांनी धन्यवाद कार्ड दिले तर नियम न पाळणार्या वाहनचालकांवर ई चलनाद्वारे कारवाई करत इशारा कार्ड दिले.
Last Updated : Jan 30, 2021, 10:56 AM IST
TAGGED:
......