मुंबई :राज्यभरात महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या कामगार आणि कर्मचाऱ्यांचा संप सुरू केला होता. या संपाचे नेतृत्व त्यावेळेला आज सत्ताधारी असलेले आमदार गोपीचंद पडळकर सदाभाऊ खोत देखील करत होते. तसेच आझाद मैदानामध्ये वकील गुनारत्न सदावर्ते यांनी देखील संपकरांना आंदोलनामध्ये पाठिंबा दिला होता. त्यावेळी ते स्वतः काळा कोट घालून या आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनामधेय वकील गुणरत्न सदावर्ते यांनी चितावणीखोर विधान केले होते. त्याचा परिणाम आंदोलनावर परिणाम झाला होते. त्या विधानानामुळे लोक चिथावले गेले.
गुणरत्न सदावर्तेंवर कारवाई :काही लोकांनी आत्महत्या देखील केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला होता. या आंदोलनाच्या वेळी त्यांनी घोषणा केल्या होत्या. तसेच त्याच्यानंतर गाणे म्हटले होते. त्यासोबत लोकांच्या भावनांना हात घालणारी विधान केली, हे करत असताना त्यांनी वकिलांच्या संदर्भातला असलेला पेहराव तसाच ठेवला होता. यामुळे बार कौन्सिलने गुणरत्न सदावर्तेंवर ही कारवाई केली होती. आज बार कौन्सिलने अखेर कारवाई करत 2 वर्षासाठी सदावर्ते यांना निलंबित केले.
शिस्त भंगाची कारवाई : बार कौन्सिलने कारवाई करताना असा आरोप ठेवलेला आहे की, वकिलांसंदर्भातील आचारसंहितेचे मार्गदर्शक नियम आणि तत्वांचे उल्लंघन झाले आहे. त्याचे उल्लंघन गुणरत्न सदावर्ते यांनी सार्वजनिक ठिकाणी केलेले आहे. त्यामुळे हे वकिली पेशासाठी शोभनीय नाही. या कारवाईस स्थगिती मिळावी, अशी याचिका गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयात केली होती. मात्र उच्च न्यायालयाने ही स्थगिती नाकारली होती. तसेच त्यांच्या मुलीचा ड्रायव्हिंग करतानाचा वायरल झालेल्या व्हिडिओ बाबतची याचिका रद्द करत त्या प्रकरणात दिलासा दिला गेला. मात्र बार कौन्सिलबाबत शिस्त भंगाच्या कारवाईपासून दिलासा न्यायालयाने दिला नव्हता
शिस्तभंगाची कारवाई सुरूच :मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जी. एस. पाटील आणि नीला गोखले यांच्या खंडपीठाने याबाबत वकील गुनारत्न सदावर्ते यांच्यावर ताशेरे मारत फटकारले. त्यांना सांगितले की, तुम्हाला सुनावणीसाठी लक्झरी वेळ पुन्हा पुन्हा इथे दिला जाणार नाही. तुमच्या बाबतची शिस्तभंगाची कारवाई सुरूच राहील. तुम्हाला शिस्तभंगाच्या नियमांना डावलता येणार नाही. तुमच्या मुली संदर्भातील व्हायरल व्हिडिओ बाबतची केस रद्द होत आहे, हे लक्षात घ्या. असे देखील न्यायालयाने अधोरेखित केले होते.
हेही वाचा : Gunaratna Sadavarte: बार कौन्सिलने केलेल्या कारवाईबाबत वकील सदावर्ते यांना दिलासा नाही