महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Law Exam : विधी विषयाची परीक्षा तोंडावर; अद्यापही हॉल तिकीट नाही, विद्यार्थी चिंतेत - Law Subject Exam

मुंबई विद्यापीठाची ( Mumbai University ) विधी विषयाची परीक्षा 29 नोव्हेंबर 2022 रोजी आहे मुंबई विद्यापीठाशी 6000 पेक्षा अधिक विद्यार्थी संलग्न आहेत. जे विधी विषयासाठी शिक्षण घेत आहे. मात्र मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभारामुळे अद्यापही विद्यार्थ्यांना परीक्षेचे प्रवेश पत्र अर्थात हॉल तिकीट प्राप्त ( Law Subject Exam ) नाहीत. परिणामी हजारो विद्यार्थी चिंतेत आहेत.

Law Exam
मुंबई विद्यापीठ

By

Published : Nov 27, 2022, 5:23 PM IST

मुंबई : मुंबई विद्यापीठाची ( Mumbai University ) विधी विषयाची परीक्षा 29 नोव्हेंबर 2022 रोजी आहे मुंबई विद्यापीठाशी 6000 पेक्षा अधिक विद्यार्थी संलग्न आहेत. जे विधी विषयासाठी शिक्षण घेत आहे. मात्र मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभारामुळे अद्यापही विद्यार्थ्यांना परीक्षेचे प्रवेश पत्र अर्थात हॉल तिकीट प्राप्त ( Law Subject Exam ) नाहीत. परिणामी हजारो विद्यार्थी चिंतेत आहेत.

विधी विषयाच्या परीक्षेचे विद्यार्थी चिंतेत

विद्यापीठाचा भोंगळ कारभार :मुंबई विद्यापीठाच्या संकेतस्थळावर विधी महाविद्यालयानी काही सांख्यिकी माहिती परिपूर्ण रीतीने भरली नव्हती, म्हणून मागील महिन्यात असे होईल याचा अंदाज काहींनी वर्तवला होता. अनेक विद्यार्थ्यांचा डेटा महाविद्यालयानी वेळेत भरणे अपेक्षित आहे. महाविद्यालयाने विद्यापीठाकडे बोट दाखवावे त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान ( Law Exam Student Hall Ticket Not Received Yet ) होते.

परिस्थिती महाविद्यालयामुळे ओढवली : याबाबत मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा संदर्भात कामकाज पाहणारे विनोद मलाले यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की "ही परिस्थिती महाविद्यालयामुळे ओढवलेली आहे. कारण सेमिस्टर एक, दोन, तीन आणि चार बाबत विद्यार्थ्यांचा डेटा महाविद्यालयांनी मुंबई विद्यापीठाच्या पोर्टलवर भरणे अपेक्षित आहे. त्यांनी अजूनही राहिलेला डेटा त्वरित भरावा. म्हणजे प्रक्रिया पूर्ण होईल."


परीक्षा तोंडावर असताना प्रवेश पत्र नाही :ह्या बाबत महाराष्ट्र स्टुडंट असोसिएशनचे विकास शिंदे यांनी सांगितले, हाजारो विद्यार्थी विधी विषयावर परीक्षा करिता बसलेले आहेत. त्यांना परीक्षा तोंडावर आली तरी प्रवेश पत्र नाही मिळाले. याबाबत उच्च शिक्षण विभाग, मंत्री विभागाचे संचालक यांची जबाबदारी आहे की विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. विद्यार्थ्यांना काळजी आहे आमची परीक्षा कुठे होईल आणि खरंच होणार आहे किंवा नाही असा संभ्रम त्यांच्यात निर्माण झालेला आहे. वारंवार होणाऱ्या तांत्रिक चुका याचा मनस्ताप विद्यार्थ्यांना का असा प्रश्न विद्यार्थी वर्ग विचारत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details