महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sulochana Chavan Passes Away : लावणीसम्राज्ञी पद्मश्री सुलोचना चव्हाण यांचे निधन; शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार - लावणीसम्राज्ञी पद्मश्री सुलोचना चव्हाण यांचे निधन

ज्येष्ठ पार्श्‍वगायिका, (Senior playback singer) लावणीसम्राज्ञी पद्मश्री सुलोचना चव्हाण (Padmashri Sulochana Chavan passed away) यांचे शनिवारी वृद्धापकाळाने निधन झाले. 'फड सांभाळ तुऱ्याला गं आला...' 'पाडाला पिकलाय आंबा..' 'मला म्हणत्यात पुण्याची मैना' यांसारख्या एकाहून एक लावण्या त्यांनी ठसकेबाज केल्या.

Lavani empress Padmashri Sulochana Chavan
लावणीसम्राज्ञी पद्मश्री सुलोचना चव्हाण

By

Published : Dec 10, 2022, 12:56 PM IST

Updated : Dec 10, 2022, 4:41 PM IST

मुंबई:

पद्मश्री सुलोचना चव्हाण यांचे निधन

मराठी रसिक मनावर ६० वर्षांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणाऱ्याज्येष्ठ पार्श्‍वगायिका, लावणीसम्राज्ञी पद्मश्री सुलोचना चव्हाण यांचे शनिवारी वृद्धापकाळाने निधन (Padmashri Sulochana Chavan passed away) झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. दुपारी १२ च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. यातच त्यांची प्रकृर्ती खालावली होती. गिरगाव फणसवाडीमधील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सुलोचना चव्हाण यांचे निधन म्हणजे मराठी मनोरंजन सृष्टीसाठी मोठा धक्का मानला जात ( Lavani empress Padmashri Sulochana Chavan )आहे. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार - लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. याबाबतची माहिती राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मुंबईत दिली. सुलोचना चव्हाण या ज्येष्ठ कलाकार होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर दुःख व्यक्त केले आहे. तसेच शासकीय इथे मामात त्यांना मानवंदना देण्यात यावी अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आल्या असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले आहे.

चाळीत बालपण :सुलोचना चव्हाण यांचा जन्म मुंबईत 17 मार्च 1933 साली झाला. त्यांचे माहेरचे आडनाव कदम होते. मुंबईतील एका चाळीत त्यांचे बालपण गेले. वयाच्या पाचव्या वर्षापासूनच त्यांनी गायनाला सुरुवात केली. सुलोचना चव्हाण यांच्या घरचाच श्रीकृष्ण बाळमेळा होता. याच मेळ्यात त्यांच्यासोबत अभिनेत्री संध्या यांनी सुद्धा काम केले होते. श्रीकृष्ण बाळमेळ्याच्या माध्यमातून सुलोचना चव्हाण यांचे कलाक्षेत्रात पहिले पाऊल पडले. मेळ्यांच्या सोबतीत त्यांनी हिंदी, गुजराती आणि उर्दू नाटकात बालभूमिका केलेल्या आहेत. त्यांची मोठी बहीण स्वतः कला क्षेत्रात नव्हती. परंतु त्या सुलोचना चव्हाणांना नेहमी प्रोत्साहन देत असत. सुलोचनाने उत्तम गावे असे त्यांना वाटायचे. असे असले तरी, सुलोचना चव्हाण यांना गायनाचे कोणतेही शास्त्रीय शिक्षण मिळाले नव्हते.

ग्रामोफोन रेकॉर्ड ऐकून गायनाचा रियाज : त्याकाळात ग्रामोफोन रेकॉर्ड ऐकून ऐकूनच त्या गायनाचा रियाज (Senior playback singer) करायच्या. त्याकाळात परिस्थितीशी झगडून त्यांनी गाण्याची कला आत्मसात केली वत्सलाबाई कुमठेकर यांनी गायलेली 'सांभाळ गं, सांभाळ गं, सांभाळ दौलत लाखाची' ही लावणी सुलोचना चव्हाण लहानपणी वारंवार गुणगुणत असत आणि त्यासाठी आईकडून त्यांनी भरपूर बोलनेही खाल्ले होते. कारण मुलींनी लावणी ऐकू नये, गाऊ नये असे त्यांच्या आईला वाटायचे. पुढे मराठी लावणीसम्राज्ञी ठरलेल्या सुलोचना चव्हाण यांनी पहिली लावणी, आचार्य अत्रे यांच्या 'हीच माझी लक्ष्मी' या चित्रपटात गायली. याचे संगीतकार होते वसंत देसाई, आणि ही लावणी हंसा वाडकर यांच्यावर चित्रित झाली होती. या एका गाण्याने सुलोचना चव्हाणांच्या कारकिर्दीला लावणीच्या दिशेने वळण लागले. त्या लावणीचे शब्द होते 'मुंबईच्या कालेजात गेले पती, आले होऊनशान बीए बीटी...'. यानंतरच आचार्य अत्रे यांनीच त्यांना 'लावणीसम्राज्ञी' असा किताब दिला.

सुलोचना चव्हाण यांचे पहिले गाणे :श्रीकृष्ण बाळमेळ्यामध्येच मेकअपमन दांडेकर हे चित्रपटसृष्टीशी संबंधित होते. त्यांच्यामुळेच संगीत दिग्दर्शक श्याम बाबू भट्टाचार्य पाठक यांच्याकडे सुलोचना चव्हाण यांनी पहिले गाणे गायले. तो चित्रपट हिंदी भाषेतील होता आणि चित्रपटाचे नाव होते 'कृष्ण सुदामा'. पहिले गाणे जेंव्हा सुलोचना चव्हाण गायल्या तेंव्हा त्यांचे वय होते अवघे नऊ वर्षे. आपण गाणे रेकॉर्डिंगसाठी फ्रॉकमध्ये गेलो होतो, अशी आठवण देखील त्या आवर्जून सांगतात. पार्श्वगायन करताना मोहम्मद रफी, मन्ना डे, शमशाद बेगम, गीता दत्त, श्यामसुंदर यांच्यासारख्या आघाडीच्या गायकांबरोबर गाण्याची संधी त्यांना मिळाली. करियरच्या सुरुवातीलाच अनेक दिग्गजांबरोबर त्यांनी काम केले आहे. वयाच्या सोळाव्या वर्षी गायक मन्ना डे यांच्यासोबत त्या 'भोजपुरी रामायण' गायल्या होत्या. मराठी व्यतिरिक्त त्यांनी हिंदी, गुजराती, भोजपुरी, तामीळ, पंजाबी या भाषांमध्ये त्यांनी भजन, गझल असे विविध प्रकारदेखील हाताळले आहेत.

सुलोचना यांच्या प्रसिद्ध लावण्या :नाव गाव कशाला पुसता अहो मी आहे कोल्हापुरची, मला हो म्हणत्यात लवंगी मिरची, तरुणपणाच्या रस्त्यावरच पहिलं ठिकाणं नाक्याचं, सोळावं वरीस धोक्याचं, पाडाला पिकलाय आंबा, फड सांभाळ तुर्‍याला गं आला, तुझ्या उसाला लागंल कोल्हा, कळीदार कपूरी पान, कोवळं छान, केशरी चुना रंगला काथ केवडा वर्खाचा विडा घ्या हो मनरमणा, अशा एकापेक्षा एक लावण्यां गात त्यांना मराठी रसीक जनांवर भुरळ टाकली होती.

Last Updated : Dec 10, 2022, 4:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details