नवी मुंबई:नवी मुंबईपासून सुरू होणारी ही मोहीम देशभरात एक लाख किलोमीटरहून अधिक अंतर कापणार. भारतीय 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त तरुणांना संरक्षण दलात सामील होण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी भारत मिशन हॉवरक्राफ्ट ऑपरेटिंग सेंटर, 73 एसिव्ही स्क्वाड्रन, इंडियन कोस्ट गार्ड, सेक्टर नवी मुंबई येथे एका कार्यक्रमात सुरू करण्यात आले आहे. 'द वॉरियर एक्स्पिडिशन 32/ 26' हा हर्ष गुप्ता आणि सुमित कुमार सिंग यांचा संयुक्त उपक्रम आहे. या मोहिमेला भारतीय सशस्त्र दलाने पाठिंबा दिला आहे. नवी मुंबईपासून सुरू होणारी ही मोहीम देशभरात एक लाख किलोमीटरहून अधिक अंतर कापणार आहे. 15 ऑगस्ट 2023 रोजी नवी दिल्ली येथे याचा समारोप होणार आहे.
सैन्य भरतीसाठी मार्गदर्शन :भारतीय सशस्त्र दलातील सैनिक आणि अधिकारी देशभरातील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये एक दिवसीय कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. हे अधिकारी तरुणांमध्ये सैन्यात सामील होण्याची भावना जागृत करतील. ही पहिलीच संधी असेल जिथे विद्यार्थ्यांना लष्करातील जवान आणि उच्च अधिकार्यांना भेटण्याची आणि बोलण्याची संधी तर मिळेल. यासोबतच त्यांना सैन्यात भरती होण्यासाठी योग्य मार्गदर्शनही मिळेल. भारतीय तटरक्षक दलाच्या हॉवरक्राफ्ट सुविधेतून या मोहिमेला हिरवा झेंडा दाखवून 73 ए सी व्ही स्क्वॉड्रनचे कमांडिंग ऑफिसर अॅडमिरल तुषार नकुल कोतबे यांनी अभियानाचे उद्घाटन केले. या समारंभाला भारतीय तटरक्षक दल, लष्कराचे इतर अधिकारी उपस्थित होते.
राज्यपालांकडून ध्वजाला मानवंदना :भारतीय प्रजासत्ताकाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज शिवाजी पार्क मुंबई येथे झालेल्या मुख्य शासकीय सोहळ्यात राष्ट्रीय ध्वज फडकवून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी राज्यपालांनी प्रजासत्ताक दिन संचलनाचे निरीक्षण केले व विविध पथकांकडून मानवंदना स्वीकारली. तसेच राज्यपालांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यातील जनतेला उद्देशून मराठीतून संबोधन केले.