महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Oct 22, 2022, 9:12 PM IST

ETV Bharat / state

BEST BUS: बेस्ट कर्मचाऱ्यांवर लाठीमार कामगारांनी केली होती बोनसची मागणी

BEST BUS: मुंबईत बोनससाठी संपर्क करणाऱ्या कामगारांवर पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे. मुंबईमध्ये दिवाळीच्या तोंडावर बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं होतं. हे आंदोलन सांताक्रुज या ठिकाणी सुरू होतं आणि पोलिसांमध्ये आणि कामगारांमध्ये मोेठ्या प्रमाणात बाचाबाची झाली. आणि पोलिसांनी कामगारांवर लाठीचार्ज केला होता.

BEST BUS
BEST BUS

मुंबई:मुंबईत बोनससाठी संपर्क करणाऱ्या कामगारांवर पोलिसांनी लाठीचार्ज केलेला आहे. मुंबईमध्ये दिवाळीच्या तोंडावर बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं होतं. हे आंदोलन सांताक्रुज या ठिकाणी सुरू होतं आणि पोलिसांमध्ये आणि कामगारांमध्ये मोेठ्या प्रमाणात बाचाबाची झाली. आणि पोलिसांनी कामगारांवर लाठीचार्ज केला होता.

बेस्ट कामगारांवर लाठीचार्ज केले: मनसेचे उपाध्यक्ष केतन नाईक हे या बेस्ट कामगारांच्या संदर्भात पोलिसांची मध्यस्थी करण्यासाठी मुद्दा सोडवण्यासाठी गेले होते. हे गेले असताना पोलीस आणि त्यांच्यामध्ये संभाषण झाले आणि संभाषणानंतर वातावरण असे काय झाले की पोलिसांनी बेस्ट कामगारांवर लाठीचार्ज सुरू केला होता.

या मुद्द्याला घेऊन आंदोलन:हे कंत्राटी कामगार जे बोनस आणि पगार वेतनवाढ या दोन्ही मुद्द्याला घेऊन आंदोलन करत होते. आणि त्यात मनसेचे केतन नाईक मध्यस्ती करण्यासाठी पोचले असताना शब्द शब्दावरून वातावरण गरम झाले होते. त्यामुळे पोलिसांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांवर लाठीचार्ज केला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details