मुंबई -गानकोकिळा लता मंगेशकरच्या निधनाची ( Lata Mangeshkar Passed Away ) वार्ता कळताच चाहत्यांना दुःख झाले. अनेकांनी आणि आपल्या आवडत्या गायिकेचे दर्शन घेण्यासाठी पेडर रोड येथील प्रभुकुंज या इमारतीबाहेर गर्दी करायला सकाळपासून सुरुवात केली. यावेळी लता मंगेशकर यांच्या रुपात साक्षात सरस्वतीनेच जन्म घेतला होता. लता मंगेशकर यांच्या सारखे भारतातच नाही तर जगातही कोणीच होऊ शकत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांच्या एका चाहत्याने दिली.
गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांचे निधन झाले ( Lata Mangeshkar Passed Away ) आहे, त्या 92 वर्षाच्या होत्या. गेल्या 9 जानेवारीपासून त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात ( Breach Candy Hospital Mumbai ) गेल्या काही दिवसांपासून उपचार सुरु होते.
लता मंगेशकर यांना 9 जानेवारील कोरोनाची लागण झाल्यामुळे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना न्यूमोनियाची लागण झाली होती. 30 जानेवारीला लता मंगेशकर कोरोनामुक्त झाल्या होत्या. मात्र, शनिवारी (दि. 5 फेब्रुवारी) अचानक त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यामुळे देशभरातील चाहत्यांमध्ये अस्वस्थता पसरली होती.