मुंबई- गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना 28 दिवसांच्या उपचारानंतर अखेर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. दीदींनी स्वतः सोशल मीडिया अकाऊंटवर ट्विट आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट करुन चाहत्यांना ही माहिती दिली.
या पोस्टमध्ये दीदींनी आपल्याला न्यूमोनिया झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होतं. त्यानंतर ब्रीच कँडी रुग्णालयातील डॉक्टरांची टीम आणि रुग्णालयातील कर्मचारी डोळ्यात तेल घालून माझी शुश्रूषा करत होते. अखेर त्यांना मी पूर्णपणे बरी झाली असल्याची खात्री पटल्यानंतर त्यांनी मला घरी जाण्याची परवानगी दिली. मात्र, आता देवाच्या आणि माई बाबांच्या आशीर्वादाने मी पुन्हा घरी परत आले आहे.