महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईच्या महापौरांनी वैमानिक दीपक साठे यांच्या पार्थिवाचं घेतलं अंत्यदर्शन, निवास्थानाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त - केरळ विमान दुर्घटना

साठे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार असताना एअरफोर्सच्या वतीनेही त्यांना मानवंदना देण्यात येत आहे. साठे यांच्या मुंबईतील पवई चांदिवली नाहर येथील निवास्थानी मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात केले करण्यात आले आहे.

pilot deepak sathe  last rituals of pilot deepak sathe  kerala plane crash pilot  वैमानिक दीपक साठे अंत्यसंस्कार  केरळ विमान दुर्घटनेतील पायलट  केरळ विमान दुर्घटना  वैमानिक दीपक साठे
मुंबईच्या महापौरांनी वैमानिक दीपक साठे यांच्या पार्थिवाचं घेतलं अंत्यदर्शन

By

Published : Aug 11, 2020, 12:10 PM IST

मुंबई - शुक्रवारी केरळच्या कोझिकोड येथे घडलेल्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्राचे सुपुत्र वैमानिक दीपक साठे यांचा मृत्यू झाला होता. त्यांचे पार्थिव रविवारी दुपारी विशेष विमानाने मुंबई आणण्यात आले. आज सकाळी पवई चांदिवली नाहर येथील निवास्थानी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे. यावेळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही वैमानिक दीपक साठे यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

मुंबईच्या महापौरांनी वैमानिक दीपक साठे यांच्या पार्थिवाचं घेतलं अंत्यदर्शन, निवास्थानाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त

दरम्यान, साठे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार असताना एअरफोर्सच्या वतीनेही त्यांना मानवंदना देण्यात येत आहे. साठे यांच्या मुंबईतील पवई चांदिवली नाहर येथील निवास्थानी मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात केले करण्यात आले आहे. वैमानिक दीपक साठे यांचे संपूर्ण कुटुंबही निवास्थानी दाखल झाले असून साठे यांच्यावर विक्रोळी टागोर नगर स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details