मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या आणि राज्यातील शेवटच्या टप्प्यासाठी २९ एप्रिलला मतदान होणार आहे. या टप्प्यामध्ये राज्यातील १७ मतदारसंघाचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी राज्यात अनेक राजकीय दिग्गज नेत्यांच्या सभा पार पडल्या. प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून राज्यात महिनाभरापासून धडाधडणाऱ्या प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी थंडावणार आहेत.
रणधुमाळी लोकसभेची: राज्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार, सोमवारी मतदान - election
मतदारांपर्यंत पोहोचण्याची आज शेवटची संधी असल्याने आपल्या स्टार प्रचारकांना मैदानात उरवण्याकडे प्रमुख पक्षांचा कल असणार आहे.
राज्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावणार
कॉर्नर मिटींग, गेट मीटिंग, घरोघरी जाऊन उमेदवारांच्या भेटीगाठी घेत टिपेला पोहोचलेला चौथ्या टप्प्यातील प्रचार शनिवारी सायंकाळी ६ वाजता थंडावणार आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्याची आज शेवटची संधी असल्याने आपल्या स्टार प्रचारकांना मैदानात उरवण्याकडे प्रमुख पक्षांचा कल असणार आहे. आज मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो होणार आहे. मावळ मतदारसंघात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे प्रचार करणार आहेत.
राज्याच्या १७ मतदारसंघातील लढती
- उत्तर मुंबई - गोपाळ शेट्टी, उर्मिला मातोंडकर
- उत्तर-पश्चिम मुंबई - गजानन कीर्तिकर, संजय निरुपम
- उत्तर-पूर्व मुंबई - मनोज कोटक, संजय पाटील
- उत्तर-मध्य मुंबई - पूनम महाजन, प्रिया दत्त
- दक्षिण-मध्य मुंबई - राहुल शेवाळे, एकनाथ गायकवाड
- दक्षिण मुंबई - अरविंद सावंत, मिलिंद देवरा, डॉ. अनिल कुमार
- नंदुरबार - हीना गावीत, के.सी. पाडवी
- धुळे - डॉ. सुभाष भामरे, कुणाल पाटील, अनिल गोटे
- दिंडोरी - भारती पवार, धनराज महाले, जिवा पांडू गावीत
- नाशिक - हेमंत गोडसे, समीर भुजबळ, माणिकराव कोकाटे
- पालघर - राजेंद्र गावीत, बळीराम जाधव
- भिवंडी - कपिल पाटील, सुरेश टावरे, प्रा. ए. डी. सावंत
- कल्याण – डॉ. श्रीकांत शिंदे, बाबाजी पाटील
- ठाणे - राजन विचारे, आनंद परांजपे
- मावळ - श्रीरंग बारणे, पार्थ पवार, राजाराम पाटील
- शिरूर - शिवाजीराव आढळराव-पाटील, डॉ. अमोल कोल्हे,
- शिर्डी - सदाशिव लोखंडे, भाऊसाहेब कांबळे, भाऊसाहेब वाकचौरे