महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पवईत पुन्हा दरड कोसळली; जीवितहानी नाही, पालिकेचे दुर्लक्ष - पवई रेन न्यूज

अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत पालिका, एमएमआरडीएला पत्र लिहून या गंभीर समस्येबाबत माहिती देतानाच यावर कार्यवाही करण्याची विनंती केली. मात्र, आजवर घटनास्थळी भेट देण्यापलिकडे पालिकेने कोणतेच ठोस पाऊल उलचलले नाही, असे स्थानिक रहिवासी कैलास कुशेर यांनी सांगितले.

POWAI
पवईत पुन्हा दरड कोसळली

By

Published : Aug 5, 2020, 5:51 PM IST

Updated : Aug 5, 2020, 6:24 PM IST

मुंबई- सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पवई येथील इंदिरानगर झोपडपट्टीवर दरड कोसळल्याची घटना आज सकाळी घडली आहे. या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दोन घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

पवईत पुन्हा दरड कोसळली...

पवईतील डोंगराळ भागात वसलेल्या इंदिरा नगर,चैतन्य नगर, गौतम नगर भागात दरवर्षी दरड कोसळण्याच्या घटना घडतच असतात. त्यामुळे येथील लोकांचा जीव नेहमीच टांगणीला असतो. 26 जुलै 2005 मध्ये मुंबईत पडलेल्या महाप्रलयकारी पावसात येथे दरड कोसळल्याने ५ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सातत्याने दरड कोसळण्याच्या लहान मोठ्या घटना पावसाळ्यात नेहमी घडतच असतात.

अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी याबाबत पालिका, एमएमआरडीएला पत्र लिहून या गंभीर समस्येबाबत माहिती देतानाच यावर कार्यवाही करण्याची विनंती केली. मात्र, आजवर घटनास्थळी भेट देण्यापलिकडे पालिकेने कोणतेच ठोस पाऊल उलचलले नाही, असे स्थानिक रहिवासी कैलास कुशेर यांनी सांगितले. त्यानंतर येथील स्थानिक रहिवाशांसह येथील समाजसेवकांनी पालिकेकडे याबाबत वारंवार तक्रारी केल्या आहेत. या डोंगराळ भागात तत्काळ संरक्षण जाळी लावण्यात यावी, अशी मागणी काही संघटनांनी केली होती. परंतु, याठिकाणी पालिका आणि एमएमआरडीए यांमध्ये समन्वय नसल्याने प्रक्रिया सुरू होत नाही.

परिणामी, येथे दरड कोसळल्याच्या घटना सुरूच आहेत. एकीकडे धुवाधार पाऊस आणि त्यात दरडींचा धोका यामुळे येथील रहिवाशांचे जीवन मरण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्यां पालिका अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी येथील स्थानिक रहिवासी करत आहेत.

Last Updated : Aug 5, 2020, 6:24 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details