आमदार प्रकाश सुर्वेंनी केली पहाणी मुंबई : काल मागाठाणे मेट्रो स्थानकाजवळ दरड कोसळल्याने वेस्टन एक्सप्रेस हायवेचा सर्व्हिस रोड आता बंद करण्यात आला आहे. भूस्खलनानंतर आमदार प्रकाश सुर्वे एमएमआरडीए आणि मेट्रोचे अधिकारी आज पाहणीसाठी आले. तर दुसरीकडे कस्तुरबा मार्ग पोलिसांनी बिल्डरविरुद्ध गुन्हा दाखल करून अभियंता आणि कंत्राटदाराला अटक केली आहे.
मेट्रो स्थानकाला धोका :बोरिवली पूर्व मागाठाणे मेट्रो स्टेशन बाजूच्या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. स्टेशनचे गेट प्रवाशांसाठी बंद आहे. मागाठाणे मेट्रो स्टेशनच्या बाजूची माती पहिल्याच पावसात वाहून गेली. मेट्रो स्टेशनचे काम सुरु आहे. असे असतांना ढिसाळ कामामुळे मेट्रो स्थानकाला धोका निर्माण झाल्यास जबाबदार कोण, असा सवाल नागरिक करत आहेत.
संरक्षण भिंत बांधणे अपेक्षित :पश्चिम द्रुतगती मार्गावर बोरिवलीतील मागाठाणे मेट्रो स्थानकाजवळील C. C. I प्रकल्पाचे विकासकाने बांधकामासाठी उत्खनन केले. भूस्खलन रोखण्यासाठी संरक्षण भिंत बांधणे अपेक्षित असतानाही, विकासकाने या प्रकल्पात मजबूत, संपूर्ण संरक्षण भिंत बांधली नाही. त्यामुळे महापालिकेच्या माध्यमातून बांधलेला रस्ता खचल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे.
प्रकरणाची सखोल चौकशी करा :या प्रकल्पाला लागूनच राज्य सरकारच्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे मागाठाणे स्थानक आहे. भूस्खलन कोसळण्याच्या घटना घडत राहिल्यास मागाठाणे स्थानक मेट्रो कोसळून मोठी जीवित होण्याची शक्यता आहे. तथापि, सदर विकासकाने मेट्रो प्राधिकरणाकडून नो-डिस्टर्बन्स सर्टिफिकेट घेतले आहे की नाही? त्याचप्रमाणे विकासकाला नो-डिस्टर्बन्स सर्टिफिकेट देताना बांधकाम अटींचे पालन केले आहे का? याची माहिती द्यावी, अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी केली आहे. तसेच या प्रकणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
नागरिकांचे प्रचंड हाल :सदर विकासकाने सार्वजनिक मालमत्तेचे केलेल्या नुकसानाबाबत दंडात्मक कारवाई करण्यात यावी. सद्यस्थितीत पुढील कामास स्थगिती देण्यात यावी. मागाठाणे मेट्रो स्थानकाजवळ बांधकाम सुरू असून दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे रस्त्याचा काही भाग वाहून गेला होता. यानंतर खबरदारी म्हणून रस्ता बंद करण्यात आला. मात्र, या भागात मोठ्या प्रमाणात कार्यालये आहेत. रस्ता बंद असल्याने या भागातील नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत असल्याचे सुर्वे म्हणाले. मुसळधार पावसामुळे नागरिंकाचे हाल होत आहे. या परिसरात वाहनांना प्रवेश प्रतिबंधित आहे. कारण सर्व वाहनांना आत जाण्यास मनाई आहे. दुरुस्तीनंतर रस्ता पूर्ववत होईल, अशी अपेक्षा असली तरी, आता रस्त्याचा आणखी एक भाग खचला आहे. त्यामुळे नागरिकांना आणखी काही दिवस त्रास सहन करावा लागण्याची शक्याता आहे.
हेही वाचा -Heavy Rain : भिवंडीत मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत ; सर्वत्र पूरस्थिती, अनेक गावांचा संपर्क तुटला