महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Holi Festival : होळीच्या निमित्ताने अधिक संख्येने धावणार लालपरी; कोकणात एसटीच्या जादा २५० बसेस

होळीचा सण जवळ आल्याने चाकरमान्यांची गावी जाण्याची मोठी घाई झाली आहे. कोकणात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी महामंडळाने नियमित बसेस व्यतिरिक्त 250 ज्यादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Lalpari Will Run in More Numbers on Occasion of Holi; Additional 250 Buses of ST Will Leave in Konkan For Holi Festival
लालपरी, होळीच्या निमित्ताने अधिक संख्येने धावणार; होळीसाठी कोकणात एसटीच्या जादा २५० बसेस

By

Published : Feb 7, 2023, 6:52 PM IST

मुंबई :होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी एसटी महामंडळाने नियमित बसेस व्यतिरिक्त २५० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. होळीच्या सणासाठी अधिक संख्यने नागरिक गावी जातात. त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी महामंडळाने निर्णय घेतला आहे. होळी वेळी प्रचंड गर्दी एसटी बसला होते. परिणामी काही बसमध्ये चेंगराचेंगरी होते. त्यात लहान बालकांची काळजी तसेच ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची काळजी जरूरी असते. मात्र, प्रचंड गर्दीमुळे याला अडथळा होतो.


एसटी महामंडळातर्फे आवाहन :दरम्यान, सुरक्षित प्रवासासाठी प्रवाशांनी एसटीच्या बसेसमधून प्रवास करावा, असे आवाहनही महामंडळातर्फे करण्यात आले आहे. गणेशोत्सवाबरोबरच होळीचा सणही कोकणात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणासाठी मुंबईहून लाखो चाकरमानी कोकणातील आपापल्या गावी जात असतात. त्यामुळे या सणाच्या काळात प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते. अशा प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी एसटी सज्ज झाली असून, महामंडळाने यंदा २५० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.



कोकणात होळी सणानिमित्त एसटी बस आणखी सोडणार :होळी सण काही दिवसांवर आला असून, मार्च महिन्यात होळी आणि दुसऱ्या दिवशी धुलीवंदन आहे. कोकणात हा सण मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. या सणानिमित्त शहरातील चाकरमानी कोकणात धाव घेतात. मात्र, अनेकदा मेल, एक्स्प्रेस गाड्या फुल असतात. त्यामुळे कोकणवासीयांची चांगलीच अडचण होते. त्यामुळे एसटी प्रशासनाने होळीनिमित्त जास्तीच्या बसेसची सोय केली आहे.

एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय यांचे मत :मुंबई सेंट्रल, परळ, कुर्ला, बोरिवली, ठाणे, वसई, नालासोपारा तसेच पनवेल येथील बसस्थानकांतून खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी, मालवण आदी भागांत या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. ०३ मार्च ते १२ मार्च २०२३ दरम्यान या गाड्या कोकणातील मार्गावरून धावणार आहेत, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.

एसटी महामंडळाचे संकेतस्थळ :ज्या बसने प्रवाशांना प्रवास करायचा आहे. त्यांनी आगाऊ आरक्षणासाठी एसटी महामंडळाच्या संकेतस्थळ येथे भेट द्यावी, म्हणजे विनाअडथळा प्रवासासाठी आरक्षण बुकिंग करता येईल. प्रवासी जनतेने राज्यात कुठेसुद्धा प्रवास करताना अधिकृत एसटी बसने प्रवास करताना आगाऊ आरक्षण केले, तर प्रवास आरामदायक होईल म्हणून एसटी महामंडळाने त्यांच्या वेबसाईटवर बुकिंगची व्यवस्था केली असल्याचे उपमहाव्यवस्थापक शेखर चन्ने यांनी सांगितले. https://msrtc.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळा बरोबरच Msrtc Mobile Reservation App याचाही प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी महामंडळाकडून करण्यात आले आहे.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details