मुंबई : डॉक्टर महिलेने याप्रकरणी वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. वाकोला पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 47 वर्षीय महिला डॉक्टरला गुरुवारी संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास चंद्रप्रकाश नावाच्या व्यक्तीचा फोन आला होता. त्याने सांगितले की, ते सीआयएसएफमध्ये काम करतात. त्याने महिला डॉक्टराला सांगितले की, लष्करातील 97 मुलांची आरोग्य तपासणी महिलेच्या दवाखान्यात करायची आहे. त्याबदल्यात महिलेला चेकअपचे पैसे दिले जातील. त्या महिला डॉक्टरने यासाठी होकार दिल्यावर चंद्रप्रकाश म्हणाला की, आता त्यांचे वरिष्ठ अधिकारी तिला कॉल करतील आणि पुढील प्रक्रियेबद्दल सांगतील.
महिलेच्या मोबाईलवर एरर मेसेज :यानंतर सत्यप्रकाश नावाच्या व्यक्तीचा महिला डॉक्टरला फोन आला. त्याने सांगितले की, सैन्यात एकूण 97 मुले आहेत आणि महिला क्लिनिकमध्ये दररोज 10 मुलांची तपासणी केली जाईल. सत्यप्रकाश याने डॉक्टर महिलेला दुसऱ्या फोनवरून कॉल करण्यास सांगितले. जेणेकरून ते महिलेला ऑनलाइन प्रक्रिया समजावून सांगतील. प्रक्रिया समजून घेण्यासाठी डॉक्टर महिलेने तिच्या सासूच्या मोबाईलवरून सत्यप्रकाशला कॉल केला. त्यानंतर सत्यप्रकाशने महिलेला त्याचा बँक खाते क्रमांक दिला आणि त्या खात्यात 47500 रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. सत्यप्रकाश यांनी जितके पैसे मागितले. तितके पैसे महिलेने ट्रान्सफर केले. मात्र, ट्रान्सफर करताना महिलेच्या मोबाईलवर एरर मेसेज दिसला.