महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत दुकानांमध्ये चोरी करणारी लड्डू गँग जेरबंद - laddu gang news

मुंबईसह आसपासच्या ठिकाणी रात्रीच्यावेळी दुकानाचे शटर तोडून चोरी करण्याच्या घटना घडत होत्या. त्या प्रकरणी मुंबईच्या गुन्हे प्रकटीकरण शाखा ३च्या पथकाने लड्डू गँगला जेरबंद केले आहे.

आरोपी

By

Published : Sep 21, 2019, 6:20 PM IST

मुंबई- गेल्या काही महिन्यांपासून मुंबई शहरामध्ये रात्रीच्या वेळेस दुकानांचे शटर तोडून चोरीच्या घटना घडलेल्या होत्या. या संदर्भात मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँच युनिट 3 चे एक पथक आरोपींच्या शोधात होते. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी लड्डू गँगच्या ३ आरोपींना अटक केली आहे.

दुकानात चोरी करणारी लड्डू गँग जेरबंद


मुंबई शहरातील विविध परिसरांमध्ये रात्रीच्या वेळेस दुकानांचे शटर उचकटून चोरी करण्याच्या गुन्ह्यांमध्ये लड्डू गँग हे गेल्या काही महिन्यांपासून सतर्क होती. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून मुंबईतील भायखळा येथील एस ब्रिज जवळ सापळा रचण्यात आला होता. यावेळी एका मोटरसायकलवरून तीन व्यक्ती एस ब्रिज जवळ आल्याचे पोलीसांच्या नजरेस आले. पोलिसांनी या तिन्ही आरोपींना अटक करून तपास केला असता लड्डू गँगमधील या टोळीचा म्होरक्या नूर मोहम्मद करीम शेख उर्फ लड्डू (वय 44 वर्षे) या आरोपीवर मुंबई, ठाणे, नवी मुंबई या ठिकाणी ७० हून अधिक गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले.

हेही वाचा - 'लोकशाही महोत्सवाचे स्वागत, सर्वांनी यात सहभागी व्हा'

अटक करण्यात आलेल्या इतर दोन आरोपींपैकी सैद हुसेन नूर इस्लाम शेख उर्फ बटला (वय 24 वर्षे) या आरोपींवर सुद्धा वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी मुंबईतील आग्रीपाडा, जेजे मार्ग, काळाचौकी, आरे-किडवाई मार्ग, शिवाजी पार्क, घाटकोपर, जुहू, पायधुनी, बांद्रा व इतर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत रात्री सुमारे पंधरा दुकानाचे शटर तोडून चोऱ्या केलेल्या आहेत. या प्रकरणी पोलीस इतर आरोपींचा शोध घेत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details