मुंबई -महात्मा गांधींनी खेड्याकडे चला असे स्वातंत्र्य आंदोलनाच्या वेळी म्हटलं होतं. त्यानंतरच्या पहिला शासनाने ग्रामीण विकासाच्या संदर्भात काही पंचवार्षिक योजनाच्या माध्यमातून योजना सुरू केल्या. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाले. मात्र, अद्यापही ग्रामीण भाग रस्त्यांच्या जाळ्यापासून काही ठिकाणी खूप दूर असल्याचं लक्षात येतं. त्यामुळे कृषी क्षेत्राचा, शेतकऱ्यांचा विकास अपेक्षित होत नाही. शासनाच्याच पायाभूत सुविधांच्या संदर्भातल्या माहितीमधून ही बाब समोर येते.
अद्यापही ग्रामीण भागात रस्त्याची वनवा - राज्यातील मुख्यतः महानगर छोटी शहर, जिल्ह्याचे ठिकाण, तालुक्याचे ठिकाण या ठिकाणी रस्ते काहीसे ठीक आहेत. तर, मेट्रो शहरांमध्ये अत्यंत वेगवान आहे. रस्ते खराब झाले की रस्ते दुरुस्ती पटकन केली जाते. मात्र जिल्ह्याचे रस्ते, तालुक्याचे रस्ते यांची दुरुस्ती तितक्या वेगाने होत नाही. महाराष्ट्रामध्ये तर अनेक शेकडो खेडे आहेत की जिथपर्यंत अद्यापही पक्के रस्ते शासनाचे पोचलेले नाही.
कोकण विभाग -कोकण विभागामध्ये खेडे पक्क्या रस्त्याने जोडले गेलेले नाही. अशा, एकूण खेड्यांची संख्या ही 65 आहे. तर बारावी महिने सर्व मौसमामध्ये सर्व गावे वस्त्या एकमेकांशी जोडलेले असतात असे कोकण विभागामध्ये 4 हजार 633 रस्ते आहेत. तर, पावसाळ्यात 52 रस्त्यांचा संपर्क तुटलेले असतो. तसेच 15 रस्ते असे आहेत की बाराही महिने त्यांचा मुख्य रस्त्यांशी संपर्क नसतो. 15 खेडे असे आहेत त्यांचा आजही तालुक्याशी संपर्क नाही.
नाशिक विभाग - नाशिक विभागामध्ये 6 हजार 607 एकूण खेडे आहेत. त्यापैकी सर्व मौसमामध्ये रस्ते चांगल्या स्थितीत असतात अशा रस्त्यांची संख्या 6 हजार 501 अशी आहे. तर पावसाळ्यात संपर्क तुटलेल्या खेड्यांची संख्या 65 इतकी आहे. 41 खेड्यांमध्ये बिलकुल पक्के रस्ते नाहीत.
पुणे विभाग - पुणे या विभागामध्ये एकूण 6 हजार 650 खेड्यांची संख्या आहे. या एकूण खेड्यांपैकी 6 हजार 594 बारा रस्ते चांगले आहेत. 23 खेड्यांचा खराब हवामानाच्या काळात पक्के रस्ते नसल्यामुळे संपर्क तुटतो. तर, 33 खेडे हे पक्क्या रस्त्यांशी जोडले गेलेले नाही.