महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अम्फान चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर ओडिशा-पश्चिम बंगालकडे जाणाऱ्या श्रमिक रेल्वे २१ मे पर्यंत रद्द

कोरोना लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या श्रमिकांना त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी विविध ठिकाणाहून श्रमिक रेल्वे सोडण्यात येत आहेत. मात्र, पश्चिम बंगालकडे येत असलेल्या अम्फान या चक्रीवादळामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ओडिशा आणि बंगालच्या रेल्वे २१ मे पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.

Labor trains
श्रमिक रेल्वे

By

Published : May 20, 2020, 9:52 AM IST

मुंबई -ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या समुद्र किनाऱयावर सूपर सायक्लॉन अम्फान वादळ धडकण्याची शक्यता आहे. या वादळाचा धोका लक्षात घेऊन २१ मे पर्यंत ओडिशा आणि पश्चिम बंगालकडे जाणाऱ्या श्रमिक रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. सामाजिक न्याय विभागाचे सचिव पराग जैन यांनी याबाबत माहिती दिली.

कोरोना लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या श्रमिकांना त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी विविध ठिकाणाहून श्रमिक रेल्वे सोडण्यात येत आहेत. त्याद्वारे आत्तापर्यंत चार लाख श्रमिकांना विविध राज्यात सुरक्षित पोहोचवण्यात आले आहे. मात्र, पश्चिम बंगालकडे येत असलेल्या अम्फान या चक्रीवादळामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी या रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. ही बाब लक्षात घेऊन या राज्याकडे जाणाऱ्या मजुरांनी गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

सर्व उपाययोजना करून श्रमिक रेल्वेद्वारे आजतागायत उत्तर प्रदेश, बिहार , छत्तीसगड, जम्मू काश्मिर, उत्तराखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश, गुजरात, राजस्थान, तमिळनाडू या राज्यात सुमारे चार लाख श्रमिकांना सुरक्षित पोहोचवण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details