मुंबई- केंद्र व राज्य शासनाकडून कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आणि त्यासोबतच लॉकडाऊनमुळे अडचणीत सापडलेल्या कामगारांसाठी राज्य सरकारने कामगार नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. यासाठी कामगार विभागाने विभागानिहाय संपर्क अधिकारी यांची नावे जाहीर केली आहेत. यात प्रामुख्याने कोकण, पुणे, नागपूर, मुंबई, नाशिक, औरंगाबाद आणि अमरावतील विभागातील कामगार आयुक्तालयातील प्रमुख अधिकाऱ्यांची निवड करून त्यांचे थेट संपर्क क्रमांक अडचणीत सापडलेल्या कामगारांसाठी जारी केले आहेत.
त्यासोबतच औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयातील कोकण, पुणे, नागपूर, मुंबई, नाशिक, औरंगाबाद आणि अमरावतील विभागातील सह संचालक, अपर संचालक आदी अधिकाऱ्यांवरही कामगार नियंत्रण कक्षासाठी महत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यासोबत कामगार विभागाने राज्यस्तरीय संनियंत्रण समिती गठित केली असून त्यात माथाडी कामगार संह आयुक्त, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे अपर संचालक, इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच असंघटीत कामगारांसाठी असलेल्या विकास आयुक्त, बाष्पके संचालनालय, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातील आयुक्त, सहायक आयुक्तांवरही यासाठीची जबाबदारी सोपविण्यात आली असून या सर्व अधिकाऱ्याचे मोबाईल क्रमांक, कार्यालयातील संपर्क क्रमांक आणि त्यांचे ईमेलही कामगारांच्या विविध अडचणींसाठी देण्यात आले आहेत. या माध्यामातून राज्यातील कामगारांच्या निर्माण होणाऱ्या रोजगारा संबंधी अडचणींचे निराकरण केले जाणार असल्याची माहित कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.
संपर्क क्रमांक कामगार आयुक्तालय
कोकण विभाग -
अ. द. काकतकर, अपर कामगार आयुक्त, मुंबई . मो. 820933150, सतिश तोटावार
सहाय्यक कामगार आयुक्त, मो. 960613756
kokandivision@gmail.com 022-26573844
पुणे विभाग -
शैलेंद्र पोळ, अपर कामगार आयुक्त, पुणे (अ.का.), मो.9833773535
व्ही. सी. पनवेलकर, कामगार उप आयुक्त, पुणे, मो. 822348676
alcpune5@gmail.com 020-25541617/19
नागपूर विभाग -
व्ही. आर. पानबुडे, अपर कामगार आयुक्त, नागपूर (अ.का.),9822712115