मुंबई -ज्येष्ठ कामगार नेते दादा सामंत यांच्या निधनाचे वृत्त शुक्रवारी समोर आले. मात्र, त्यांनी आत्महत्या केली असावी असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्याच्या मृत्यूबाबत अद्याप स्पष्ट कारण समोर आले नाही. 91 वर्षांच्या दादा सामंतांनी गळफास घेतल्याचे सांगितले जात आहे.
पोलिसांनी देखील दादा सामंत यांची सूसाईड नोट सापडली असल्याची प्राथमिक माहिती दिली आहे. मात्र, त्यांच्या मृत्यू बाबत अपघाती मृत्यू अशी नोंद केल्याचे माहिती समोर येत आहे.
कामगार नेते दत्ता सामंत याचे मोठे बंधू असलेल्या दादा सामंत यांनी कामगार चळवळीत मोठे योगदान दिले होते. त्यांच्या मागे पत्नी प्रमोदिनी, तीन विवाहित कन्या, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. डॉ. दत्ता सामंत यांच्या हत्येनंतर १९९७ ते २०११ पर्यंत दादा सामंत हे कामगार आघाडी संलग्न युनियनचे अध्यक्ष होते.
या संदर्भात शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. दहिसर पोलीस ठाण्यात या संदर्भात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.