मुंबई- ऑक्टोबर महिना सुरू असला तरी पावसाने अजूनही मुक्काम सोडलेला नाही. मान्सून जरी परतला असला तरी अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर चक्रीवादळात होणार आहे. यामुळे अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. कोकण किनारपट्टी भागातील नागरिकांना ऐन दिवाळीत नैसर्गिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे.
क्योर चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीला धोका, अतिवृष्टीचाही इशारा - कोकणात अतिवृष्टीचा इशारा
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रूपांतर चक्रीवादळात होणार आहे. यामुळे अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. कोकण किनारपट्टी भागातील नागरिकांना ऐन दिवाळीत नैसर्गिक संकटाला सामोरे जावे लागणार आहे.
पुढील दोन दिवसात ‘क्यार’ हे चक्रीवादळ कोकणासह गोवा किनारपट्टीवर धडकणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर रहिवाशी आणि प्रशासनास सतर्कतेचा इशारादेखील देण्यात आलेला आहे.
सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस आहे. समुद्रात उंच लाटा उसळत असल्याने याचा फटका मच्छिमारांनाही बसला आहे. जोरदार वारे वाहणार असल्याने कोकण किनारपट्टीवरील ग्रामस्थांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या असून मच्छिमारांना दोन दिवस समुद्रात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.