महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Kunbi Community Gathering : कदम पिता पुत्रांसाठी धोक्याची घंटा - कुणबी समाजाचा मेळावा ; राजकीय नेतृत्वाची मागणी - माजी मंत्री रामदास कदम

कोकणच्या राजकारणात कुणबी समाजाची मतं निर्णयात महत्त्वाची मानली (Kunbi community demanded political leadership) जातात. कुणबी समाजाने मुंबईत एक मेळावा घेत राजकीय नेतृत्वाची मागणी केली (Kunbi community Gathering in Mumbai) आहे.

Kunbi Community Gathering
कुणबी समाजाचा मेळावा

By

Published : Oct 23, 2022, 10:31 AM IST

मुंबई : शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिवसेनेच्या अनेक जुन्या शिलेदारांनी शिंदे गटाच्या मार्ग पत्करला. यात दापोली विधानसभेचे आमदार योगेश कदम (MLA Yogesh Kadam) व त्यांचे वडील शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम (Former Shiv Sena minister Ramdas Kadam) यांच्या शिंदे गटातील प्रवेशाने एका नावाने सर्वांच्या भुवया उंचावल्या. रामदास कदम हे कोकणच्या राजकारणातील मोठे नाव आहे. शिवसेनेचे नेते म्हणून त्यांची कोकणात ओळख आहे. शिवसेनेकडून अनेक मंत्री पद त्यांनी भूषवली. मात्र, जेव्हा शिवसेनेत फूट पडले त्यावेळी कदम पिता-पुत्रांनी शिंदे गटाचा मार्ग पत्करला. मात्र, आता पुढची निवडणूक कदम पिता-पुत्रांसाठी अवघड जाण्याची शक्यता आहे. कारण, कोकणच्या राजकारणात कुणबी समाजाची निर्णयात मते महत्त्वाची मानली (Kunbi community demanded political leadership) जातात. त्या कुणबी समाजाने मुंबईत एकमेळावा घेत राजकीय नेतृत्वाची मागणी केली (Kunbi community Gathering in Mumbai) आहे.

प्रतिक्रिया देताना कुणबी समाजाचे नेते संदीप राजपुरे



कुणबी समाजाचे नेतृत्व विधानसभेत :कोकणामध्ये असणारा मोठ्या संख्येतील कुणबी समाज हळूहळू एकवटू लागला आहे. हे मुंबईत मेळाव्यामध्ये पाहिल्यावर स्पष्ट झालं. दापोली खेड मंडणगड तालुक्यामधील कुणबी समाजाचे संघटन करणे, कुणबी जोडो अभियान राबवणे आणि कुणबी समाजाची राजकीय दशा आणि दिशा अशा तीन विषयांवरील चर्चासत्रने हा मेळावा संपन्न झाला. कुणबी समाजाच्या तब्बल 22 विविध संघटनांनी देखील या मेळाव्यामध्ये सहभाग घेतला होता. कुणबी समाजाला राजकारणामध्ये जागा मिळायला हवी. कुणबी समाजाचे नेतृत्व विधानसभेमध्ये असलं पाहिजे यासाठी हा मेळावा घेतल्याचं आयोजकांनी देखील स्पष्ट (Kunbi Community Gathering) केले.


कुणबी समाजाचा वनवास :याविषयी बोलताना कुणबी समाजाचे नेते संदीप राजपुरे म्हणाले की, निर्णय झालेला आहे. जो कोणी आपल्या समाजाचा नेता असेल त्याला या निवडणुकीत निवडून देणे हे आम्ही ठरवलेलं आहे. पक्ष कोणताही असेल पण जो पक्ष कुणबी समाजाच्या नेतृत्वाला उमेदवारी देईल, त्याच पक्षाला आणि त्या पक्षाच्या उमेदवाराला हा कुणबी समाज मतदान करेल, हे आमचं या मेळाव्यात ठरलेलं आहे. निर्णायक मतं असलेल्या कुणबी समाजाला मागची 35 वर्ष वनवास भोगाव लागला. आता यापुढे कोणासमोर हात पसरावे लागता कामा नये, कुणबी समाजाला स्वतःच नेतृत्व मेळावा म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला (Kunbi community) आहे.


राजकारणामध्ये स्थान पाहिजे :दरम्यान, कुणबी समाजाला राजकारणामध्ये आता स्थान मिळाले पाहिजे. कुणबी समाजाचे नेतृत्व विधानसभेमध्ये असले पाहिजे अशा स्वरूपाचा निर्धार मुंबईत आयोजित केलेल्या मिळाव्यामध्ये सर्व कुणबी बांधवांनी केला. जो राजकीय पक्ष कुणबी समाजाला नेतृत्वाची संधी देईल, निवडणुकीसाठी उमेदवारी देईल, त्या राजकीय पक्षाच्या मागे दापोली विधानसभेतील सर्व कुणबी समाज उभा राहील असा निर्धार करण्यात आला. त्यामुळे आता पुढची विधानसभा निवडणूक कदम पितापुत्रांसाठी अवघड जाणार हे (demanded political leadership) निश्चित आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details