मुंबई- बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (नॅशनल पार्क) मधून वाहणारी कृष्णा नदी आज (शनिवारी) सकाळी दुथडी भरून वाहू लागल्याने पार्कमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नदीचे पाणी राष्ट्रीय उद्यानामध्ये शिरल्याने आज सकाळपासूनच पार्क पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे.
कृष्णा नदीच्या पाण्याचा संजय गांधी नॅशनल पार्कला फटका; पार्क पर्यटकांसाठी बंद
कृष्णा नदीचे पाणी संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये शिरल्याने पार्कचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
नदीचे पाणी राष्ट्रीय उद्यानामध्ये शिरले आहे
पार्कमध्ये असलेल्या वनाधिकारी विभागीय कार्यालयात देखील पाणी शिरले होते. यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समजते. अद्याप नेमके किती व काय नुकसान झाले याबाबत आढावा घेतला जात आहे. संध्याकाळनंतरच अधिकृत नुकसान कळेल, असे वनअधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
दोन वर्षांपूर्वी याच कृष्णा नदीचा राष्ट्रीय उद्यानाला मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. त्यावेळी विभागीय कार्यलयासह निवासी क्वार्टरमध्ये देखील पाणी शिरले होते.