मुंबई - बोरिवलीच्या नॅशनल पार्कमधून वाहणारी कृष्णा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. ही नदी पुढे नॅशनल पार्कमधून बोरिवली पूर्व व दहिसर मार्गे बाहेर पडत दहिसर नदीला मिळते. बोरीवली पूर्वेच्या दौलत नगर आणि दहिसर पूर्वेकडील अंबावाडी परिसरात यामुळे पाणी भरण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
बोरिवलीची कृष्णा नदी ओव्हरफ्लो; पूर्व भाग जलमय होण्याची भीती - dahisar
बोरिवलीच्या नॅशनल पार्कमधून वाहणारी कृष्णा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. ही नदी पुढे नॅशनल पार्कमधून बोरिवली पूर्व व दहिसर मार्गे बाहेर पडत दहिसर नदीला मिळते. बोरीवली पूर्वेच्या दौलत नगर आणि दहिसर पूर्वेकडील अंबावाडी परिसरात यामुळे पाणी भरण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
बोरिवलीची कृष्णा नदी ओहरफ्लो
दोन वर्षांपूर्वी बोरिवलीच्या नॅशनल पार्क परिसरातील बंगल्यामध्ये पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. आताही पावसाची धार कायम आहे. त्यामुळे रस्त्यावर पाणी साचले आहे. पाऊल असाच कायम राहिला तर नॅशनल पार्कची पुनारावृत्ती होते की काय? अशी भीती या परिसरातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे नागरीकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.