महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोपर्डी पीडितेच्या पालकांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट - lawyer

आज मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी आणि कोपर्डी प्रकरणातील पीडित मुलीच्या आईवडिलांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. त्या 13 जुलैला कोपर्डी येथील निर्भया बलात्कार प्रकरणाला 3 वर्ष पूर्ण होत आहे.

कोपर्डी पीडितेच्या पालकांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

By

Published : Jun 20, 2019, 10:05 PM IST

Updated : Jun 20, 2019, 10:19 PM IST

मुंबई - मराठा समाजातील विविध प्रश्नासंदर्भात आज मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी आणि कोपर्डी प्रकरणातील पीडित मुलीच्या आईवडिलांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे.


येत्या 13 जुलैला कोपर्डी येथील निर्भया बलात्कार प्रकरणाला 3 वर्ष पूर्ण होत आहेत. मात्र अद्याप या खटल्यातील आरोपींना शिक्षा मिळाली नाही. त्यामुळे हा खटला चालविण्यासाठी उज्ज्वल निकम यांच्या सारखा मोठा वकील नेमावा, अशी मागणी कोपर्डी निर्भया बलात्कार पीडित मुलीच्या आई वडिलांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे भेट घेऊन केली आहे.

कोपर्डी पीडितेच्या पालकांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट


येत्या 13 जुलैला निर्भयाची तिसरी पुण्यतिथी आहे. यावेळी मराठा समाज इतर संघटनांना घेऊन मोठा कार्यक्रम राबविणार आहे. तसेच सरकारने आमच्या मागण्या मान्य न केल्यास पुढची दिशा आम्ही ठरवू, असा इशारा निर्भयाच्या वडिलांनी दिला आहे.

Last Updated : Jun 20, 2019, 10:19 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details