मुंबई -कोकण रेल्वे मार्गावर विद्युतीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू असून येत्या डिसेंबर महिन्यात रेल्वेचे विद्युतीकरणाचे काम पूर्ण होणार आहे. सध्या कोकण मार्गावरील 740 किमीपैकी 370 किमीपर्यंतचे विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असून उर्वरित भागात सुमारे 85 ते 90 टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि भारतीय रेल्वेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनीत शर्मा यांनी दिली आहे.
इलेक्ट्रिक प्रवासी गाड्या धावणार
शंभर टक्के रेल्वे मार्ग विद्युतीकरण करून प्रदूषणाला आळा घालण्यासाठी भारतीय रेल्वेत प्रयत्न करत आहे. रेल्वे मार्गावरील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. 740 किलोमीटरच्या कोकण रेल्वे मार्गावर विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. कोकण मार्गावरील विद्युतीकरणाचे काम दोन टप्प्यात सुरू आहे. पहिला टप्पा रोह्यापासून ते दक्षिणेकडे आणि दुसऱ्या टप्प्यात गोव्यातील करमळीपर्यंत विद्युतीकरणाचे काम सुरू आहे. सध्या कोकण रेल्वे मार्गावरील 740 किमीपैंकी 370 किमीपर्यंतचे विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले असून उर्वरित भागात सुमारे 85 ते 90 टक्के काम पूर्ण झाले आहेत. त्याचबरोबर सध्या मालगाड्या चालविण्यास सुरूवात केली आहे. तर, वर्षाअखेरीसपर्यंत प्रवासी इलेक्ट्रिक प्रवासी गाड्या चालविण्यास सुरूवात केली जाईल, अशी माहिती रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि भारतीय रेल्वेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनीत शर्मा यांनी दिली आहे.