महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 20, 2021, 3:09 PM IST

Updated : Nov 20, 2021, 4:00 PM IST

ETV Bharat / state

Honey Trap : कोल्हापूरच्या उद्योजकाला अडकवले; तीन कोटीची खंडणी वसूल करणाऱ्या तिघांना मुंबई पोलिसांकडून अटक

हनी ट्रॅपद्वारे कोल्हापूरच्या नामांकित साखर व्यापाऱ्याला बदनामीची धमकी देऊन खंडणीची मागणी करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. (honey trap and extortion case) याप्रकरणी एका महिलेसह तिघांना 17 लाखांची खंडणी घेताना अटक करण्यात आली आली. ही कारवाई गुन्हे शाखेच्या युनिट 10च्या पथकाने गुरुवारी केली. (mumbai crime branch unit 10 team)

Honey Trap
हनी ट्रॅप

मुंबई -हनी ट्रॅपद्वारे कोल्हापूरच्या नामांकित साखर व्यापाऱ्याला बदनामीची धमकी देऊन खंडणीची मागणी करणाऱ्या टोळीचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. (honey trap and extortion case) याप्रकरणी एका महिलेसह तिघांना 17 लाखांची खंडणी घेताना अटक करण्यात आली आली. ही कारवाई गुन्हे शाखेच्या युनिट 10च्या पथकाने गुरुवारी केली. (mumbai crime branch unit 10 team) लुबना ऊर्फ सपना वजीर, अनिल ऊर्फ आकाश बन्सीलाल चौधरी आणि मनीष नरेंद्र सोधी या तिघांकडून सुमारे 49 लाखांची रोकड, सोन्याचे, हिरेजडित दागिने, सात मोबाईल व दोन महागड्या कार असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. न्यायालयाने या तिघांनाही 25 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (police custody) या गुन्ह्यातील अन्य एका महिलेच्या अटकेसाठी पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे.

कोल्हापूरच्या साखर व्यापाऱ्यास हनी ट्रॅपमध्ये अडकवून त्यांच्याकडून सव्वातीन कोटींची खंडणी उकळल्याचा धक्कादायक प्रकार गुन्हे शाखेच्या कारवाईत उघडकीस आला आहे. याप्रकरणी फॅशन डिझायनर महिलेसह दोन सराफांना अटक करण्यात आली आहे. (fashion designer arrested over honey trap case) लुबना वझीर (47), अनिल चौधरी (42) आणि मनीष सोदी (48) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव आहेत. तिघेही अंधेरीतील रहिवासी आहे. लुबना ही फॅशन डिझायनर आहे. मनीष आणि अनिल हे सराफ आहेत.

हेही वाचा -'मी दुबई ला चाललोय, सरकारी यंत्रणेने माझ्यावर लक्ष ठेवावे!'

पुढे आणखी पैशांची मागणी झाल्याने तक्रारदार यांनी गुन्हे शाखेत तक्रार दिली. त्यानुसार कक्ष 10 ने गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. 18 नोव्हेंबर रोजी आरोपींनी आणखी 17 लाखांची मागणी केली. पैसे घेऊन अंधेरीतील एका कॉफी शॉपमध्ये बोलावले. ठरल्याप्रमाणे व्यापारी पैसे घेऊन तेथे पोहोचताच गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून त्यांना अटक केली आहे. यात तिघांना अटक करण्यात आली असून पसार महिलेचा शोध सुरू आहे.

अंधेरीतील रहिवासी असलेल्या या तिघांकडून पोलिसांनी 29 लाखांची रोकड 8 लाख 15 हजारांचे सोने व हिरेजडीत दागिने, 2 लाख 20 हजारांचे सात मोबाईल, 5 लाखांची होंडा कार, 5 लाखांची फोक्सवॅगन कार असा 49 लाख 35 लहुजारांचा मुद्देमाल जप्त केला. स्थानिक न्यायालयाने या तिघांनाही 25 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणी एका महिलेचा शोध सुरू आहे.

काय आहे प्रकरण -

कोल्हापूर येथील साखरेचे व्यापारी असलेले तक्रारदार व्यवसायानिमित्त 2016 मध्ये गोवा येथे गेले. तेथे आरोपी महिलेसोबत ओळख झाली. पुढे ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. 2019मध्ये संबंधित व्यावसायिक कामानिमित्त मुंबईत एका पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबले असताना लुबना हिने मैत्रिणीसह सोबत जेवण्याचा आग्रह केला. दोघीही त्यांच्या रूममध्ये पोहोचल्या. गप्पा, जेवण उरकल्यानंतर कागदपत्रे देण्याच्या बहाण्याने एक जण बाहेर लॉबीमध्ये गेली. थोड्या वेळाने ती महिला परतली म्हणून ते दरवाजा उघडण्यासाठी दरवाजाकडे गेले. संबंधित महिलेने तेथेच बोलण्यात गुंतवून थांबवले. पुढे काही समजण्याच्या आतच अचानक कपडे बदलून टॉवेल गुंडाळून बसलेल्या महिलेने धमकावत व्हिडिओ करण्यास सुरुवात केली. पुढे हेच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत मार्च 2019 ते आतापर्यंत 3 कोटी 26 लाख रुपये उकळले.

Last Updated : Nov 20, 2021, 4:00 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details