मुंबई :पुलाव म्हटले की, तोंडाला पाणी सुटते. हाच पुलाव एखाद्या भांडणाचे, हल्ल्याचे कारण ठरू शकतो. हे मात्र मुंबईमध्ये घडलेल्या घटनेतून स्पष्ट झाले आहे. हॉटेलमध्ये जेवायला गेलेल्या तीन मित्रांनी चिकन पुलावची ऑर्डर दिली होती. मात्र, चिकन पुलाव आल्यानंतर त्यांना तो कच्चा आणि अर्धवट शिजलेला दिसला, याची तक्रार त्यांनी हॉटेलमध्ये उपस्थित असलेल्या अब्दुल समद यांच्याकडे केली. त्यानंतर झालेल्या वादाचे पर्यावसन चाकू हल्ल्यात झाले आहे. याप्रकरणी आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंबोली पोलीस पुढील तपास करत आहेत.
चाकूने हल्ला :गुन्हेगारीच्या घटनांमध्येमुंबईमध्ये 8.83 टक्क्यांनी वाढ झाली आहे.जोगेश्वरी येथील एका हॉटेलमध्ये चिकन पुलाव खाण्यासाठी तीन मित्र गेले होते. त्यांनी हॉटेलमधून चिकन पुलाव ऑर्डर केला. तोपर्यंत सर्व काही ठीक होते. काही वेळातच टेबलावर ऑर्डर केलेला चिकन पुलाव आला. तिने मित्राने चिकन पुलाव खायला सुरुवात केली. तेव्हा चिकन पुलाव शिजलेला नसून तो कच्चा त्यांना आढळून आले. याबाबत हॉटेलमध्ये काम करणाऱ्या अब्दुल समद सांगितले असता अब्दुलने तिन्ही मित्रांना उडवाउडवीचे उत्तर दिले. त्यानंतर संतापलेल्या मित्रांनी अब्दुल याला कच्चा पुलाव दिल्याबाबत विचारला. त्यावर अब्दुल आणि तिघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. शाब्दिक बाचावाचीचे नंतर वादात रूपांतर झाले. वाद इतका शीगेला पोहचला की, अब्दुलने चाकूने हल्ला करायला सुरुवात केली. या चाकू हल्ल्यात एकाच्या खांद्याला दुखापत झाली आहे. याबाबत आंबोली पोलीस अधिक तपास करत आहे.