महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Kisan Sampada Yojana : किसान संपदा योजनेचं अनुदान भाजपा मुख्यमंत्र्यांनी लाटलं-सचिन सावंत यांचा गंभीर आरोप - गॅस सबसिडी

Kisan Sampada Yojana : काँग्रेस सरचिटणीस सचिन सावंत यांनी किसान संपाद योजनेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडलंय. विरोधकांवर मोदी वांरवार भ्रष्टाचाराचा आरोप करतात. मात्र, त्यांच्याच पक्षातील भ्रष्टाचारा त्यांना दिसत नसल्याचं सावंत यांनी म्हटंलय.

Kisan Sampada Yojana
Kisan Sampada Yojana

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 15, 2023, 9:39 PM IST

सचिन सांवत यांची प्रतिक्रिया

मुंबईKisan Sampada Yojana :देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार विरोधी पक्षातील नेत्यांवर, घराणेशाही आणि भ्रष्टाचाराबाबत बोलत आहेत. मात्र, भाजपा नेत्यांनी किसान संपाद योजनेच्या अंतर्गत लाभ घेतल्याचा आरोप काँग्रेस सरचिटणीस सचिन सावंत यांनी केलाय. मोदींना पक्षातील घराणेशाही, भ्रष्टाचार दिसत नसल्याची टीकादेखील सावंत यांनी केलीय.



हा आर्थिक परिवारवादच :किसान संपदा योजनेच्या माध्यमातून कंपन्यांना दहा कोटी रुपयांचं अनुदान दिलं जातं. या योजनेमार्फत भाजपा नेते विजयकुमार गावित यांची मुलगी, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीला 10 कोटी रुपयाचा लाभ मिळाल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आलाय. त्यामुळं भाजपा परिवारवादच चालवत असल्याचं सचिन सावंत यांनी म्हटलंय. सर्वसामान्य जनतेतून उद्योजक निर्माण करणं सरकारचं धोरण असलं पाहिजं. मात्र, भाजपा सरकार आपलंच घर भरतंय. त्यांना विरोधकांचा भ्रष्टाचार दिसतो. मात्र भाजपाचा भ्रष्टाचार दिसत नसल्याची टीका सचिन सावंत यांनी केलीय.


शेतकऱ्याला बळ देण्याऐवजी या योजनेच्या माध्यमातून भाजपा नेते भ्रष्टाचार करून आपलेच खिसे भरत आहेत. हा आर्थिक परिवारवाद मोदींना कसा दिसत नाही? काँग्रेस नेते सचिन सावंत

शेतकरी उपाशी, भाजपा तुपाशी : पंतप्रधान नरेंद्र मोदी नागरिकांना गॅस सबसिडी सोडायला सांगतात, तर दुसरीकडे भाजपा नेत्यांच्या नातेवाईकांना केंद्रीय योजनांच्या सबसिडीच्या रूपात वाटप करतात. हा राष्ट्रवाद, कौटुंबिक वाद मोदींना दिसत नाही का? हाच खरा भाजपाचा, मोदींचा सरकारचा चेहरा असल्याचं सावंत म्हणाले. जनतेला सबसिडी सोडण्यास सांगणारे पंतप्रधान भाजपा नेत्यांना अनुदान सोडण्यासाठी कधी सुचवणार आहोत?. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'ना खाऊंगा, ना खाने दूंगा' अशी घोषणा केली होती, मात्र, त्यांच्याच पक्षाचे नेते देशाला खातायत. मोदी त्याकडं का लक्ष देत नाहीत? या योजनेचा खरा लाभ शेतकऱ्यांना मिळायला हवा. मात्र, मोदी सरकारच्या काळात शेतकरी दिवसेंदिवस संकटात सापडला आहे. शेतकरी उपाशी असून भाजपा नेते तुपाशी असल्याचा हल्लाबोल सावंत यांनी केलाय. शेतकऱ्यांच्या नावाखाली भाजपा नेत्यांचे नातेवाईकच लाभ घेत आहेत. ‘कुंपणच शेत खाते’ असा हा प्रकार असल्याचं सावंत यांनी म्हटलंय.

हेही वाचा -

  1. Supreme Court Hearing On Shiv Sena : शिवसेनेचं चिन्ह, पक्षाबाबत सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावणी
  2. Dombivli Building Collapse: धोकादायक इमारतमधून बाहेर पडण्यास नकार, तीन मजली इमारत कोसळल्यानं ढिगाऱ्याखाली अडकले!
  3. Jayant Patil on EC : निवडणूक आयोगाला सांगूनही, आयोगाने 'तो' निर्णय दिला; आयोगाच्या निर्णयावर जयंत पाटील नाराज

ABOUT THE AUTHOR

...view details