मुंबई - आरबीआयकडून सहकार क्षेत्रातील पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेवर 6 महिण्यांसाठी निर्बंध लादण्यात आल्यामुळे आता, पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांना त्यांच्या बचत खात्यातून मर्यादित रक्कम काढता येणार आहे. तर, या समस्येतून ग्राहकांना कसे बाहेर काढता येईल याबद्दल चर्चा करत असल्याचे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.
पीएमसी बँकेच्या संदर्भात आरबीआय व अर्थ मंत्रालयाशी संपर्क सुरू आहे - किरीट सोमय्या - pmc bank
आरबीआयकडून सहकार क्षेत्रातील पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेवर 6 महिण्यांसाठी निर्बंध लादण्यात आल्यामुळे आता, पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांना त्यांच्या बचत खात्यातून केवळ 1 हजार रुपये काढता येणार आहेत.
पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेवर लादण्यात आलेल्या निर्बंधानंतर आता पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ग्राहकांना त्यांच्या बचत खात्यातून केवळ 1 हजार रुपये काढता येणार आहेत. आरबीआयकडून 35-अ अनुसार लादण्यात आलेल्या या निर्बंधानंतर पुढील 6 महिने बँक ग्राहक व छोटे गुंतवणूकदार यांना याचा त्रास सहन करावा लागणार आहे. आरबीआयकडून लादण्यात आलेल्या निर्बंधानंतर यासंदर्भात आपण अर्थ मंत्रालय व आरबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून लवकरात लवकर बँक ग्राहकांना या समस्येतून बाहेर कसे काढता येईल याबद्दल चर्चा करत असल्याचे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - पैशाची हेराफेरी सुरू : मुंबईत पकडली ६६ लाखाची रक्कम, राजकीय कार्यकर्ता ताब्यात