मुंबई - शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर व कार्यालयावर सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) छापे घातल्यानंतर आता राज्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपचे माजी खासदार किरीट सोमैया यांनी सरनाईक यांच्यावरील कारवाईचे स्वागत करताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व ठाकरे परिवारावर हल्लाबोल केला आहे.
प्रताप सरनाईक यांच्या कुटुंबाच्या अनेक कंपन्या आहेत. त्या कंपन्या बेनामी असतील. त्यांचा कारभार व्यवस्थित नसेल. सरकारी पैसा किंवा भ्रष्टाचाराचा पैसा त्यांनी वळवला असेल तर, त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी. सरनाईक यांच्याबद्दल मी अशा प्रकारच्या अनेक गोष्टी ऐकल्या होत्या,' असा दावाही सोमैया यांनी केला. ठाकरे सरकारचे नेते बेनामी व्यवहार, भ्रष्टाचार कव्हर करण्यासाठी दबाव आणत आहेत का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. "शिवसना नेते प्रताप सरनाईक यांना परकीय किंवा विदेशी मालमत्ता, घोटाळेबाजांशी संबंध, पारदर्शक नसलेल्या उत्पन्नाची माहिती ईडीला द्यावीच लागणार, कोणीही कायद्याच्या वर नाही" असेही किरीट सोमैया म्हणाले आहेत.
प्रकरण काय आहे?