महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Somaiya pre-arrest bail : नील सोमय्या यांच्या अटकपूर्व जामिनावरची सुनावणी टळली सोमवारी होणार निर्णय - मुंबई सत्र न्यायालयात

किरीट सोमय्या यांचा मुलगा (Kirit Somaiya's son) नील सोमय्यांना पीएनजी बॅंक घोटाळ्या प्रकरणी (PNG bank scam case) अटक होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी मुंबई सत्र न्यायालयात अटकपुर्व जामीनासाठी धाव घेतली. मात्र या अर्जावर आज सुनावणी होऊ शकली नाही ती आता सोमवार 28 फेब्रुवारी रोजी होणार आहे.

Nil Somaiya
नील सोमय्यां

By

Published : Feb 25, 2022, 12:57 PM IST

Updated : Feb 25, 2022, 1:34 PM IST

मुंबई:पीएनजी बॅक घोटाळाप्रकरणी नील सोमय्या यांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर नील सोमय्या यांनी मुंबई सत्र न्यायालयातअटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. मात्र त्यांच्या अर्जावर आज सुनावणी होऊ शकली नाही. त्यांनी पीएमसी बँक घोटळ्याचे पैसे निकॉन इन्फ्रास्टक्चर कंपनीत गुंतवल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होता. निकॉन इन्फ्रा ही कंपनी ही सोमय्या यांच्या मालकीची आहे. पीएमसी बँकेच्या घोटाळ्यातील आरोपी राजेश वाधवान याचे नील सोमय्या यांच्याशी संबंध आहेत तसेच या प्रकरणी सोमय्या बाप-बेटे तुरुंगात जातील असे राऊत यांनी सांगितले होते. याच प्रकरणी आता नील सोमय्या यांनी मुंबई सत्र न्यायालयात अटक पूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. यावर आता सोमवारी म्हणजे 28 फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी
होणार आहे.

Last Updated : Feb 25, 2022, 1:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details