मुंबईKirit Somaiya On Oxygen Plant Scam : कोविड काळात ऑक्सीजन जनरेशन प्लांटची उभारणीमध्ये 6 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी प्रिनाम परब यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, बुधवारी रात्री उशिरा नागपाडा पोलीस ठाण्यात रेमिन छेडा (Romin Chheda) याच्या विरोधात भारतीय दंड संविधान कलम 418, 465, 467, 468, 471, 218, 120 ब आणि 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घोटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने समन्स पाठवून आज आरोपी रोमिन छेडा याला चौकशीला बोलावलं होतं. आज दुपारी १ वाजल्यापासून रोमिन छेडा याचा जबाब नोंदवण्याचे काम आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात रात्री उशिरापर्यंत सुरु होतं.
कोविड अनेक रुग्ण दगावले : मुंबई महापालिकेत उद्धव ठाकरे सेनेचे नेते आणि अनेक कंपन्यांनी कोविडला कमाईचं साधन बनवलं होतं. बुधवारी रात्री नागपाडा पोलीस स्टेशन (Nagpada Police Station) येथे मुंबई पोलीस आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने गुन्हा दाखल केला असल्याची माहिती, भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. यासंदर्भात पहिली तक्रार 10 ऑगस्ट, 2021ला आझाद मैदान पोलीस स्टेशन येथे दाखल केली होती. मुंबईत त्या वेळेला ऑक्सिजन अभावी अनेक कोविड रुग्ण दगावले होते. त्यावेळेला महापालिकेतील सत्ताधारी उद्धव ठाकरे सेनेचे नेते आणि काही कंपन्या यांनी कोविडला कमाईचे साधन मानत होतं. मोठ्या प्रमाणात बोगस पद्धतीने बोगस कंपन्यांना ऑक्सिजन प्लांटचे कॉन्ट्रेक्ट् देण्यात आलं. हे प्लांट बसवण्यात अत्यंत दिरंगाई झाली, त्यामुळं अनेक हॉस्पिटलमध्ये कोविड ऑक्सिजन पुरवठा डिस्टर्ब झाला होता, अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली आहे.
दिल्ली येथे टाकले छापे: उद्धव ठाकरे सेनेच्या (Uddhav Thackeray) नेत्यांनी रोमिल छेडा आणि त्याच्याशी संबंधित हायवे कन्स्ट्रक्शन कंपनी यांना 53 प्रकारचे कॉन्ट्रॅक्ट् दिलं होतं. त्यात राणी बाग येथील पेंग्विनच्या कॉन्ट्रक्ट्पासून ऑक्सिजनचे प्लांट लावण्याचंही कॉन्ट्रक्ट होतं. आयकर विभागाने काही आठवड्यापूर्वी रोमिन छेडा आणि हायवे कन्स्ट्रक्शन कंपनी, युनिली इंडिया लिमिटेड यांच्या मुंबई, अहमदाबाद, लखनी, दिल्ली येथे छापे टाकले होते. ईडीने ही या संबंधात चौकशी सुरु केली असल्याची माहिती, किरीट सोमय्या यांनी दिली आहे.
9 रुग्णालये कंत्राटदाराच्या ताब्यात: नागपाडा पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यामध्ये मुंबईतील जम्बो कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारणीसाठी जी दोन कंत्राटी दिली होती. त्यापैकी मुंबई महानगरपालिकेच्या नऊ रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारणीच्या कंत्राटाचे काम हे संबंधित साईट कंत्राटदाराच्या ताब्यात दिल्यापासून 30 दिवसात पूर्ण करावयाची अट होती. मात्र या अटीप्रमाणे कंत्राटदार हायवे कन्स्ट्रक्शन कंपनीकडून 30 दिवसांत काम पूर्ण न झाल्याने, त्यांना निवेदेतील अटी शर्तीनुसार मुंबई महानगरपालिकेने एकूण तीन कोटी 16 लाख 32 हजार 426 रुपयांचा दंड आकारला. वी एन देसाई रुग्णालय, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, जीटीबी रुग्णालय, कस्तुरबा रुग्णालय, नायर रुग्णालय, कुपर रुग्णालय, भाभा रुग्णालय, के. एम रुग्णालय आणि सायन रुग्णालय अशी 9 रुग्णालये कंत्राटदाराच्या ताब्यात देऊन ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारणीसाठी देण्यात आली होती.
हेही वाचा -
- Mumbai Oxygen Plant : ऑक्सिजन प्लांट वेळेत पूर्ण न केल्याने कंत्राटदारांना ४.०७ कोटींचा दंड
- कथित बॉडी बॅग घोटाळ्या प्रकरणी किशोरी पेडणेकरांची ईडीकडून आज होणार चौकशी
- Tajbagh Trust Embezzlement Case : ताजबाग ट्रस्ट घोटाळ्या प्रकरणी काँग्रेस नेते शेख हुसेनला अटक, दीड कोटींचा घोटाळ्याचा आरोप