मुंबई- अनेक वर्षापासून विरोधी पक्षातील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप लावून त्यांना कोंडीत पकडणारे भाजप नेते माजी खासदार किरीट सोमैय्या आता स्वतः मोठ्या संकटात सापडले आहेत. सोमवारी एका खासगी वृत्तवाहिनीने त्यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडिओ दाखविला. त्यानंतर त्यांच्यावर विरोधी पक्षातील नेत्यांकडून, महिलांकडून जहरी टीका केली जात आहे. सध्या सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजणार आहे. अशा परिस्थितीत किरीट सोमैय्या यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
काय म्हटले आहे पत्रात?एका वृत्तवाहिनीवर व्हिडिओ क्लिप दाखविण्यात आली आहे. त्यावरून अनेक व्यक्तींना अनेक आरोप करून आक्षेप घेतले आहे. अनेक व्हिडिओ क्लिप्स असल्याचा दावा करण्यात आला आहे. अनेक महिलांवर अत्याचार केल्याचा व तशा तक्रारी असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, कोणत्याही महिलेवर अत्याचार केले नसल्याचा दावा किरिट सोमैय्या यांनी केला. माझ्यावर केलेल्या सर्व आरोपांची चौकशी व्हावी, अशी सोमैय्या यांनी देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात केली आहे. ही व्हिडिओ क्लिप किंवा इतर व्हिडिओ असल्यास सत्यता तपासावी. त्यानुसार चौकशी करावी, अशी विनंती केली आहे.