मुंबई :केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. परंतु याचिका दाखल करण्यापूर्वी खासदार संजय राऊत यांनी या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर २ हजार कोटींचा व्यवहार झाल्याचा काल आरोप केला होता. त्याचा उल्लेख या अपिलामध्ये केलेला नसल्याने याबाबत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून या प्रकरणावर लक्ष वेधले आहे. तसेच संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर योग्य ती कारवाई करण्याची विनंती निवडणूक आयोगाला केली आहे.
सोमैया यांचे निवडणूक आयोगाला पत्र :खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिलेल्या निर्णयाबद्दल बोलताना यामध्ये २ हजार कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचा आरोप केला होता. त्यावर बोलताना उद्धव ठाकरे व संजय राऊत हा दावा कोर्टाच्या अपिलात करणार का? असा प्रश्न कालच किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला होता. आज ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाविरोधात अपील दाखल करत असताना या मुद्द्याचा विचार न केल्याने किरीट सोमय्या यांनी हा प्रश्न उपस्थित केला आहे. याबाबत त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून यावर योग्य ती कारवाई करण्याची विनंती सोमय्या यांनी केली आहे.
राऊतांच्या आरोपाचा उल्लेख नाही: खासदार संजय राऊत यांनी काल बोलताना शिवसेना पक्षाचे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्यासाठी २ हजार कोटींचा सौदा झाल्याचा आरोप केला होता. संजय राऊत यांच्या या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून भाजप नेते किरीट सोमैय्या यांनी संजय राऊत यांना आव्हान दिले होते. न्यायालयात अपील करताना हा आरोप उद्धव ठाकरे व संजय राऊत करणार आहेत का? असा प्रश्न त्यांनी काल उपस्थित केला होता. आज ठाकरे गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल करण्यात आली. मात्र सर्वोच्च न्यायालयात अपील करताना २ हजार कोटीच्या व्यवहाराचा मुद्दा उपस्थित न केल्याने या निर्णयाविरोधात त्यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.