मुंबई- पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमैया यांनी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे जाऊन तक्रार केली आहे. आपल्या तक्रारीत त्यांनी एचडीआयएलचे मालक राकेश वाधवा यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केलेली आहे. ही कंपनी 2017 मध्ये दिवाळखोरीत गेली असताना त्यानंतर सुद्धा या बँकेने एचडीआयएलला तब्बल 3 हजार कोटीचे कर्ज दिले होते. त्याची रितसर चौकशी व्हावी व बँकेचे यातील दोषी अधिकारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी किरीट सोमैया यांनी केली आहे.
पीएमसी बँक प्रकरणी किरीट सोमैया यांची आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार
पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी भाजप नेते किरीट सोमैया यांनी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे जाऊन तक्रार केली आहे. 2017 मध्ये दिवाळखोरीत निघालेल्या एचडीआयएल या कंपनीला पीएमसी बँकेने तब्बल ३ हजार कोटींचे कर्ज दिले होते.
पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेची तब्बल 11 हजार कोटींची ठेव आहे. ज्यामध्ये 8 हजार कोटींचे कर्ज वाटप करण्यात आले होते. या 8 हजार कोटींपैकी तब्बल 3 हजार कोटी रुपये एचडीआयएल या कंपनीला कर्ज देण्यात आलेले होते. बँकेवर आज ओढावलेली परिस्थिती ही सर्वस्वी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमुळे झाली असून या संदर्भात सखोल चौकशीची मागणी किरीट सोमैया यांनी केली आहे. तब्बल 9 लाख 12 हजार ग्राहक असलेल्या पंजाब महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँकेच्या या आर्थिक व्यवहाराला बँकेच्या संचालकांनी परवानगी दिली कशी, असा सवालही किरीट सोमैया यांनी केला आहे.
हेही वाचा - नाशिकमध्येही पीएमसी बँकेसमोर खातेदारांच्या रांगा