महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

महाराष्ट्राचे उर्जा मंत्री नितीन राऊत यांना तिमिरातून प्रकाशा कडे नेवूया- किरीट सोमैया - power minister nitin raut

महाराष्ट्राचे उर्जा मंत्री नितीन राऊत यांना तिमिरातून प्रकाशाकडे नेवूया, असे म्हणत भाजप नेते किरीट सोमय्या यांनी टिका केली.

किरीट सोमैया
किरीट सोमैया

By

Published : Apr 4, 2020, 2:54 PM IST

मुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5 एप्रिलला रात्री 9 वाजता 9 मिनिटे लाईट बंद करण्याचे आवाहन केले आहे. मात्र, असे केल्यास तांत्रिक बिघाड होऊन संपूर्ण राज्य अंधारात जाण्याचा धोका ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केला आहे. त्यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाराष्ट्राचे उर्जा मंत्री नितीन राऊत यांना तिमिरातून प्रकाशाकडे नेऊया, असा निशाणा साधत टीका केली आहे.

बोलताना किरीट सोमैया

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सेंट्रल पॉवर ग्रीडच्या अधिकाऱ्यांशी किंवा अन्य तज्ज्ञांशी चर्चा न करता केवळ व्हाट्सअॅपच्या आधारावर बेजबाबदार वक्तव्य केले आहे. देश रात्री एक दोन वाजता झोपताना दिवे बंद ठेवून झोपतो. तेव्हा सर्व बंद होत त्यामुळे काही बिघाड होत नाही आणि 9 वाजता बंद केल्याने तांत्रिक धोका निर्माण होईल, असे वक्तव्य राऊत करतात. राऊत यांनी सतसदविवेक बुद्धीला पटेल असे बोलावे, असे भाजप नेते किरीट सोमैया यांनी निशाणा साधला. मोदींना फक्त विरोध करायचा म्हणून करायचा. त्यासाठी महाराष्ट्र सरकार मधले मंत्री वक्तव्य करताहेत, असं देखील सोमय्या म्हणाले.

काय म्हणाले होते नितीन राऊत ?

देशातील सर्वांनी एकाच वेळी लाईट बंद केल्यास विजेची मागणी एकदम कमी होईल. आधीच (लॉकडाउनमुळे कंपन्या बंद असल्याने) वीजनिर्मिती आणि मागणी याचे गणित बिघडले आहे. जर सर्वांना एकाच वेळी लाईट बंद केली तर परिस्थिती अजून बिकट होईल. एवढ्या लोकांनी एकाच वेळी लाईट बंद केल्यास राज्यातील तसेच केंद्रीय ग्रीड हाय फ्रिक्वेन्सीवर निकामी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे अशा विधानांचा पुनर्विचार व्हावा. तसेच लाईट बंद न करता दिवे लावावेत, अशी माझी आपणा सर्वांना विनंती आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे.

सद्य परिस्थितीत महाराष्ट्राची मागणी 23 हजार मेगावॅट वरून 13 हजार मेगावॅटवर आलेली आहे. लॉकडाउनमुळे औद्योगीक माणगी पूर्णतः शून्य आहे. 13 हजार मेगावॅट हे फक्त अत्यावश्यक सेवा आणि घरगुती विजेचा पुरवठा आहे. जर सर्वांनी अचानक दिवे बंद केले तर ग्रीड फेल होऊन सर्व पॉवर स्टेशन हाय फिक्वेन्सीवर ट्रिप होतील. यामुळे संपूर्ण राज्य अंधारात जाईल. महाराष्ट्रसारखे मोठे पॉवर डिमांड असलेले राज्यात जर ग्रीड फेल्युअरमुळे सर्व पॉवर स्टेशन बंद पडले तर मल्टी स्टेट ग्रीड फेल्युअर होईल आणि पूर्ण देश अंधारात जाईल. वैद्यकीय सेवा विस्कळीत होतील. एक पॉवर स्टेशन सर्व्हिसमध्ये यायला साधारण 16 तास लागतात. याप्रमाणे सर्व परिस्थिती नॉर्मल व्हायला साधारण एक आठवडा जाईल. म्हणून मला जनतेला सल्ला द्यायचा आहे. आपण करणाऱ्या या कृतीचा पुनर्विचार करावा आणि करोनाविरुद्धच्या युद्धामध्ये वीज हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. या विजेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण आम्हाला सहकार्य करावे, असे आवाहन राऊत यांनी केले आहे.

हेही वाचा -कोरोना : 'सेफ्टी किट'साठी पालिकेच्या शताब्दी, देसाई रुग्णालयात कर्मचाऱ्यांचे आंदोलन

ABOUT THE AUTHOR

...view details