महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'त्या'पैकी एका रुग्णाचा मृत्यू.. 'सरकारची संवेदनहीनता मृत्यूसाठी जबाबदार'

केईएम आणि टाटा रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागातील ५० ते ६० रुग्णांची रवानगी हिंदमाता येथील उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेत करण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि रुग्णालयावरील भार कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून या पुलाखाली तात्पुरती व्यवस्था करण्यात आली. मात्र, या प्रकाराला विरोधी पक्षातील नेत्यांनी व सामान्य लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

kirit-somaiya-criticize-on-government-in-mumbai
kirit-somaiya-criticize-on-government-in-mumbai

By

Published : Apr 14, 2020, 1:03 PM IST

मुंबई- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दादर हिंदमाता पुलाचा खाली ५५ जण आसरा घेत होते. त्यापैकी ४५ वर्षाच्या कॅन्सरग्रस्त रुग्णाचा (मुळ दिल्ली जवळचा), मृत्यू झाला आहे. मुंबई महापालिका आणि महाराष्ट्र सरकारची संवेदनहिनता यासाठी जबाबदार आहे, असे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले असून गरीब रुग्णांकडे लक्ष द्या, त्यांची काळजी घ्या, अशी विनंतीही त्यांनी सरकारकडे केली आहे.

'त्या'पैकी एका रुग्णाचा मृत्यू..

हेही वाचा-कराडजवळ एकाच रात्रीत 2 अपघात; 3 ठार, 4 गंभीर

केईएम आणि टाटा रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागातील ५० ते ६० रुग्णांची रवानगी हिंदमाता येथील उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेत करण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि रुग्णालयावरील भार कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून या पुलाखाली तात्पुरती व्यवस्था करण्यात आली. मात्र, या प्रकाराला विरोधी पक्षातील नेत्यांनी व सामान्य लोकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनंतर महापौरांनी त्यातील काही रुग्णांची व्यवस्था बांद्रा येथील हॉटेलमध्ये केली. पण काही रुग्ण तिथेच आहेत.

त्यातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे किमान शाळा, महाविद्यालयांमध्ये या रुग्णांची व्यवस्था व्हायला हवी होती. असा सूर विरोधकांकडू उमटत आहे. संचारबंदीमुळे रुग्णालय परिसरातच अडकून पडावे लागले होते. तेव्हा पालिका आणि भोईवाडा पोलिसांनी देखील इथे तात्पुरती व्यवस्था करुन दिली. रुग्णालयाच्या आवारात पडून राहण्यापेक्षा इथे किमान आडोसा आणि सोयी आहेत. शिवाय, दोन्ही वेळच्या जेवणाची समाजसेवक व संस्था व्यवस्था करतात. पण उपचार मिळत नाहीत. त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. आज त्यातीलच एका रुग्णाचा उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू झाला. त्यामुळे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी आरोग्य मंत्र्यांना विनंती केली आहे की, या गरीब रुग्णांचे हाल होत आहेत. त्यांच्याकडे लक्ष द्या.

ABOUT THE AUTHOR

...view details