भाजप नेते किरीट सोमय्या पत्रकार परिषदेत बोलताना मुंबई : बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या (Brihanmumbai Municipal Corporation) माजी महापौर आणि उद्धव ठाकरे गटाच्या प्रवक्ता किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्या सदनिका घोटाळ्याच्या आरोपापाठोपाठ आता बोगस कंपनीच्या नावे महापालिकेची कंत्राटी लाटण्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya allegations against Kishori Pednekar) यांनी केला आहे. कुटुंबीयांच्या नावे कोविड सेंटर सुरू करून घोटाळा केल्याचा आरोप करत या संदर्भात कडक कारवाईची मागणी सोमय्या यांनी केली.
भ्रष्टाचार केल्याचा आरोप : किशोरी पेडणेकर यांनी बोगस कंपनी स्थापन करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. याबाबत आपल्याकडे पुरावे असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरूनच हा घोटाळा झाल्याचा आरोपही किरीट सोमय्या यांनी केला. आता काय कारवाई करणार, असा सवाल उपस्थित केला आहे. संजय महादेव अंधारे यांच्या बोगस सह्या करून पेडणेकर यांचे बंधू यांच्या नावे कागदपत्रे तयार करण्यात आली. त्यांनी यानी फसवणूक केली असून याची चौकशी करून याबाबतचा खटला जलदगती न्यायालयात चालवण्याची मागणीही सोमय्या यांनी केली.
बोगस कागदपत्रे दिली :यांसंदर्भात कंपनी अॅक्ट 2013नूसार गुन्हा दाखल करून घेतला असून यामध्ये साईप्रसाद किशोर पेडणेकर, गिरीश रमेश देवणकर, प्रसाद महेश गवस, कैलास प्रशांत गवस यांच्या नावाने समन्स निघाले आहे. सहा फेब्रुवारीला त्यांना समन्स बजावले होते . याबाबत आपला प्रश्न उद्धव ठाकरे यांना असून शिवसेना अशीच महापालिका चालवायची का ? असा सवालही त्यांनी केला आहे. ज्या कंपनीचे रजिस्ट्रेशन करताना बोगस कागदपत्रे देण्यात आली . त्यानंतर 2017 लाही या कंपनीत जे कागदपत्रे दाखवले त्यात व्यक्ती दुसरी आहे आणि सही आणि फोटो करणारा व्यक्ती दूसरा आहे तो व्यक्ती किशोरी पेडणेकर यांचा भाऊ असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
कागदपत्रांवरील फोटो आणि सह्या बोगस : पत्रकार परिषदेत सोमय्या म्हणाले की, पेडणेकर कुटुंबीयांनी जो करारनामा दिला आहे, त्यावर संजय महादेव अंधारी यांचा नाहीये, संजय अंधारे यांची सही सुद्धा नाही. तो फोटो संजय कदम यांचा लावला आहे. त्य़ानिमित्ताने महालक्ष्मी रेसकोर्स येते कोविड सेंटर उबारून माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी लाखों कोट्यवधी रुपये दिले आहे. जे कोरोना सेंटर उभारले आहे. त्यात एकही पेशंट नव्हता, आणि असे कुठेच सेंटरही नव्हते, असा कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार किशोरी पेडणेकर यांच्या माध्यमातून झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.