मुंबई - बँक घोटाळ्याचे गुन्हेगार वधावन ब्रदर्स जामीनावर असताना लॉकडाऊन काळात फिरण्यासाठी महाराष्ट्र सरकारमधील एका अधिकाऱ्यांनी पत्र देऊन नियमभंग केलेला आहे, याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई व्हावी. तसेच याप्रकरणी सरकारने उत्तर द्यावे, यासाठी राज्यपालांना भाजप नेत्यांनी निवेदन दिले आहे.
लॉकडाउन काळात घोटाळे करणाऱ्यांना व्हीआयपी सेवा, किरीट सौमय्यांचा गृहमंत्र्यांवर आरोप - किरीट सोमैय्या न्यूज
बँक घोटाळ्याचे गुन्हेगार वधावन ब्रदर्स जामीनावर असताना लॉकडाऊन काळात फिरण्यासाठी महाराष्ट्र सरकारमधील एका अधिकाऱ्यांनी पत्र देऊन नियमभंग केलेला आहे, याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई व्हावी. तसेच याप्रकरणी सरकारने उत्तर द्यावे, यासाठी राज्यपालांना भाजप नेत्यांनी निवेदन दिले आहे.
येस बँक / डीएचएफएल घोटाळ्याचा आरोपी असलेले वाधावन ब्रदर्स, सीबीआयने त्यांना अटक आणि सीबीआयकडे हस्तांतरित केले होते, ते सध्या जामीनावर आहेत. महाराष्ट्र सरकार त्यांना जामीनावर असताना व्हीव्हीआयपी पाहुणचार देते. गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांच्या गृह विभागात जनरल सेक्रेटरी असलेल्या अमिताभ गुप्ता यांनी वाधावन यांचा कुटुंबियांना लॉक डाउन काळात फिरण्यासाठी गाड्यांची परवानगी देण्यासाठी पत्र दिले आहे. त्यामुळे हे सर्व काय चाललंय महाराष्ट्रात ? याचे उत्तर सरकारने द्यावे, असे म्हणत चौकशीची मागणी भाजपचे वरिष्ठ नेते किरीट सोमैय्या यांनी केली आहे.