महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Kiran Pavaskar : न्यायालयाच्या अवमान प्रकरणी उद्धव ठाकरेंवर गुन्हा दाखल करा - किरण पावसकर

शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे ( Shiv Sena Uddhav Thackeray ) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी न्यायालयासंदर्भात अवमानजनक वक्तव्य केल्यामुळे संविधानाचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाही अपमान झाला ( Babasaheb Ambedkar also insulted) आहे. याप्रकरणी उद्धव ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी माग किरण पावसकर ( Balasahebs ShivSena spokesperson Kiran Pavaskar ) यांनी मुंबईत केली आहे.

Kiran Pavaskar
किरण पावसकर

By

Published : Nov 13, 2022, 2:11 PM IST

Updated : Nov 13, 2022, 3:36 PM IST

मुंबई :शिवसेना उद्धव ठाकरे ( Shiv Sena Uddhav Thackeray ) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी न्यायालयासंदर्भात आव्हान कारक वक्तव्य केल्यामुळे संविधानाचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाही अपमान झाला ( Babasaheb Ambedkar also insulted) आहे. त्यांच्या या वक्तव्यासंदर्भात त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक व्हावी, अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते किरण पावसकर ( Balasahebs ShivSena spokesperson Kiran Pavaskar ) यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत केली आहे.

किरण पावसकर
न्यायालयासंदर्भात बोलताना अवमानकारक वक्तव्य :शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर शुक्रवारी घेतलेल्या गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत न्यायालयासंदर्भात बोलताना अवमानकारक वक्तव्य केली आहेत. हा केवळ न्यायालयाचाच नव्हे तर भारतीय राज्यघटनेचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचाही अपमान आहे. यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा समाज हा चवताळून उठू शकतो. समाजात कायदा आणि सुव्यवस्था बिघडू शकते. त्यामुळे याप्रकरणी उद्धव ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे प्रवक्ते किरण पावसकर यांनी मुंबईत केली आहे.


कबरी भोवतालच्या अतिक्रमणाचा पुळका का ?प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजलखानाच्या कबरी भोवती झालेले अतिक्रमण काढण्याची सूचना अथवा निर्देश माननीय न्यायालयाने दिले होते त्यानुसार राज्य सरकारने हे अतिक्रमण हटवले आहे मात्र हे अतिक्रमण हटवल्यानंतर काही लोकांना त्यांचा पुळका आला आहे हा पुळका का आला आहे हे त्यांनी स्पष्ट करावे असे आव्हानही पावस्कर यांनी नाव न घेता जितेंद्र आव्हाड यांना दिले. छत्रपती शिवरायांनी अफजलखानाला कुठे काढला आहे हे राज्यातील जनतेला कळलेच पाहिजे तो इतिहास कायमच राहिला पाहिजे असेही पावस्कर यावेळी म्हणाले.

महाविकास आघाडी कडून मदरशांचे लांगुलचालन :महाविकास आघाडी सरकारने राज्यात सत्तेत असताना मदरशांसाठी अधिक रक्कम देऊन मदरशांचे लांगुल चालन केले आहे. असा आरोपही किरण पावस्कर यांनी यावेळी केला यासंदर्भात किरण पावस्कारांना आपले सरकार मदरशांना निधी देणार नाही का असे विचारताच मात्र त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. आपले सरकार हे सर्वांना समान न्याय देईल मराठी अथवा शासनाच्या शाळांना ज्याप्रमाणे निधी दिला जाईल त्याच प्रमाणात मुस्लिम समाजासाठी ही निधी दिला जाईल असे त्यांनी सांगितले.

Last Updated : Nov 13, 2022, 3:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details