महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

King Of LOC : 'सीमेच्या राजा'ची स्वारी जम्मू काश्मीरच्या दिशेनं रवाना, बाप्पा लवकरच पोहोचणार सीमेवर! - Ganeshotsav 2023 on india pakistan border

King Of LOC : मुंबईत गणेशोत्सवाची तयारी अंतिम टप्यात आलीय. मुंबईतून भारत-पाकिस्तान सीमेवर स्थापन होणार्‍या 'सीमेच्या राजा'ची स्वारी रविवारी जम्मू काश्मीरच्या दिशेनं रवाना झालीय. 'किंग ऑफ एलओसी’ लवकरच सीमेवरील सैन्यदलाच्या छावणीपर्यंत पोहोचणार आहे.

King Of LOC
किंग ऑफ एलओसी

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 11, 2023, 9:57 PM IST

'किंग ऑफ एलओसी’ जम्मू काश्मीरच्या दिशेनं रवाना

मुंबई King Of LOC: भारत-पाकिस्तान सीमेवरील राजा अर्थात 'किंग ऑफ एलओसी’ म्हणजे जम्मू-काश्मीरमधील पूँछ येथील गणपती बाप्पा रविवारी सकाळी वांद्रे टर्मिनस येथून ‘स्वराज्य एक्स्प्रेस’नं जम्मूसाठी रवाना झालाय. आता सीमेवर सैनिक थाटात गणेशोत्सव साजरा करणार आहेत. दरवर्षी गणपती बाप्पाची मूर्ती मुंबईतून जम्मू काश्मीरला पाठवली जातेय. यंदा या परंपरेचं चौदावं वर्ष आहे. उत्सव साजरा करून सैनिकांचा मनोबल वाढविण्याचा प्रयत्न आपण करू शकतो, असं सामाजिक कार्यकर्त्या ईशरदिदी सांगतात.

सीमेवर गणेशोत्सव :भारत-पाकिस्तान सीमेवर सैन्यदलाचे जवान गणेशोत्सव 11 दिवस मोठ्या उत्साहात साजरा करतात. पूँछमध्ये विराजमान होणारी ही गणेशमूर्ती सहा फुट उंचीची आहे. कुर्ला येथील दिव्यांग मुर्तीकार विक्रात पांढरे यांच्या गणेश चित्रशाळेत ही मूर्ती घडवलेली आहे. सामाजिक कार्यकर्त्या ईशरदीदी आणि शिवनेर सामाजिक प्रतिष्ठाणचं संस्थापक छत्रपती आवटे यांच्यातर्फे काश्मीर खोऱ्यातील पुंछ गावात १४ वर्षांपासून गणेश उत्सव साजरा (Ganeshotsav on india pakistan border) होतोय.

बाप्पाचं स्वागत अतिशय धुमधडाक्यात :दोन हजार किलोमीटर प्रवास करून बाप्पा सीमेवर पोहोचणार आहे. पुंछ जिल्ह्यातील बंधु-भगिणी बाप्पाचं स्वागत अतिशय धुमधडाक्यात स्वागत करतात. भारत- पाक सीमेवरील पुंछ हा पीरपंजाल या पर्वत श्रृंखलेतील भाग आहे. येथील घनदाट जंगलात, पर्वतीय भागात जंगली जनावरे आढळतात. येथे तीव्र प्रवाहाच्या बर्फाळ पाण्याच्या नद्या वाहतात. या सर्व नैसर्गिक आपत्तींना तोंड देऊन देशाच्या शत्रुला रोकण्याचं काम आपले जवान करत (Ganeshotsav 2023 on india pakistan border) असतात.

भक्तीभावानं उत्सवात सहभागी :सीमेवर तैनात असताना भारतीय सैनिक परिवारासोबत उत्सव साजरा करू शकत नाही. ते या बाप्पाच्या मंडपाला आपलं घर-परिवार समजुन भक्तीभावानं उत्सवात (Ganeshotsav 2023) सहभागी होतात. मुंबईत गणोशत्सवाची लगबग पाहायला मिळते. बाप्पाच्या आगमणामुळं सर्वजणचं खूश असतात. आगमनापूर्वी तयारीच्या साहित्यानं सर्व बाजारपेठा सजल्या आहेत. बाप्पाच्या आगमनाची चाहूलच सुखावणारी असते.

हेही वाचा :

  1. Ganeshotsav 2023 in Pune: राज ठाकरेंच्या हस्ते 'या' खास उपक्रमाचं पुण्यात उद्घाटन, पहा व्हिडिओ
  2. Ganeshotsav On Border: 'किंग ऑफ एलओसी’ मुंबईतून जम्मू काश्मीरकडे रवाना, सीमेवर सैनिक करणार थाटात गणेशोत्सव
  3. Ganeshotsav 2023: गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ढोल ताशांच्या खरेदीची लगबग, पाहा व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details