मुंबई - भारत सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अंतर्गत संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबवली जात आहे. यात रेल्वे स्थानकांचा देखील समावेश आहे. हार्बर मार्गावरील किंग्ज सर्कल या रेल्वे स्थानकाने स्वच्छ व सुंदर स्थानकांच्या यादीत स्थान मिळवले आहे. किंग्ज सर्कल स्थानकाने 'स्वच्छ रेल स्वच्छ भारत 2019'च्या झोनल रँकिंगमध्ये आठवा तर, प्रवाशांची संख्या आणि महसूल या विभागातून दुसरा क्रमांक पटकावला आहे.
किंग्ज सर्कल हे स्थानक मुंबईतील माटुंगा भागात मध्यस्थानी आहे. या या स्थानकाच्या शेजारी झोपडपट्टी आहे .या स्थानकात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता बघायला मिळात होती. मात्र स्थानकाचे आत्ताचे चित्र वेगळे आहे. स्थानकाच्या शेजारीच एक बाग उभारण्यात आली आहे. स्थानकाच्या भिंतींवर प्रेरणादायी सामाजिक सुविचार लिहलेले आहेत. एक स्थानिक संस्था आणि रेल्वे स्थानक प्रबंधक एन के सिन्हा यांच्या प्रयत्नांतुन स्थानकाचे रूप बदलले आहे.