मुंबई - रुग्ण आणि किडनी दाता या दोघांचेही रक्तगट वेगळे असताना किडनी ट्रान्सप्लांटचा करण्याचा प्रयोग जसलोक रुग्णालयात यशस्वीरित्या करण्यात आला आहे. अशाप्रकारे भिन्न रक्तगटाची किडनी ट्रान्सप्लांट ही पश्चिम भारतातील पहिली घटना असल्याचा दावा जसलोक रुग्णालयाने केला आहे. भिन्न रक्त गटातील किडनी ट्रान्सप्लांट यशस्वी झाल्याने अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षा यादीमधील लाखो रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
जसलोक रुग्णालयात भिन्न रक्तगटाच्या किडनी ट्रान्सप्लांटचा प्रयोग यशस्वी कोरोनामुळे देशभरात गेले चार महिने अवयव प्रत्यारोपण प्रक्रिया पूर्णपणे ठप्प होती. ३९ वर्षीय अभिषेक गुप्ता यांची तीन वर्षापूर्वी किडनी निकामी झाली. तेव्हापासून ते डायलेसिसवर आहेत. त्यांना किडनी ट्रान्सप्लांटचा सल्ला देण्यात आला होता. मात्र, कोरोना विषाणूची लागण होण्याची भीती असल्याने गेल्या चार महिन्यात ही प्रक्रिया करणे शक्य झाले नाही. अभिषेक गुप्ता यांचा रक्त गट बी पॉझिटिव्ह आहे. त्यांना याच रक्तगटाच्या किडनीची आवश्यकता होती. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यावर मिशन बिगीन अगेन अंतर्गत सर्व व्यवहारास सुरुवात झाली. रुग्णालयांनीही आवश्यक शस्त्रक्रिया करण्यास सुरूवात केली. किडनी ट्रान्सप्लांटच्या यादीत त्यांचे नाव वर होते.
हेही वाचा - वीज कंपन्यांना कर्ज घेण्यासाठी भांडवलाची मर्यादा शिथील; केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय
गुप्ता यांना त्यांच्या पत्नीने किडनी देण्याची तयारी दर्शवली होती. एखाद्या रुग्णाला अवयव प्रत्यारोपणाची गरज भासल्यास त्याच रक्तगटाच्या व्यक्तीचा अवयव असणे गरजेचे असते. मात्र, त्यांचा रक्तगट ए पॉझिटिव्ह होता. त्यामुळे भिन्न रक्तगटाच्या व्यक्तींमध्ये किडनी ट्रान्सप्लांटची प्रक्रिया राबवणे आव्हानात्मक होते. तसेच, भिन्न रक्तगटाच्या व्यक्तींमधील किडनी ट्रान्सप्लांट केल्यास गुप्ता यांना इन्फेक्शन होण्याची भीती होती. मात्र, जसलोक रुग्णालय आणि रिसर्च सेंटरने माझ्या नेतृत्वाखाली डॉ. अश्विन पाटील, डॉ. ए. रावल, डॉ. सुधिरंजन दास, डॉ. जे. जी. लालमलानी यांची एक टीम बनवून २७ जुलैला किडनी ट्रान्सप्लांट केली. गुप्ता यांना गेले काही दिवस देखरेखीखाली ठेवण्यात आले असून त्यांच्या पत्नीला डिस्चार्ज देण्यात आला आहे. गुप्ता यांची प्रकृती चांगली असल्याने किडनी ट्रान्सप्लांट प्रक्रिया यशस्वी पार पाडल्याची माहिती रुग्णालयाच्या ऍकेडमिक नेफ्रॉलॉजी विभागाचे संचालक डॉ. ऋषी देशपांडे यांनी दिली.