महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ऑनलाईन स्ट्रीमिंग करणाऱ्या कोरियन महिलेची काढली छेड, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दोघांना अटक - Mumbai Police

Mumbai Crime: मुंबईत आलेल्या कोरियन महिलेची काही स्थानिक तरुणांकडून छेड काढण्यात आली. ही Korean woman कोरियन महिला ऑनलाईन स्ट्रीमिंग करत असताना स्कूटरवरून 2 तरुणांनी तिची छेड काढली आहे.

Mumbai Crime
Mumbai Crime

By

Published : Dec 1, 2022, 9:37 AM IST

Updated : Dec 1, 2022, 12:22 PM IST

मुंबई:मुंबईत आलेल्या कोरियन महिलेची काही स्थानिक तरुणांकडून छेड काढण्यात आली. ही कोरियन महिला ऑनलाईन स्ट्रीमिंग करत असताना स्कूटरवरून 2 तरुण तिच्या बाजूला येऊन उभे राहिले. आधी त्यातील एक तरुणांनी कोरियन महिलेला तिचे नाव विचारले. त्यानंतर त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे. महिलेसोबत अश्लील वर्तनही केले आहे. त्या 2 तरुणांचा वर्तन पाहून कोरियन महिला त्या तिथून दूर जाण्याचा प्रयत्न करत होती. मात्र त्या 2 तरुणांनी स्कूटरवर त्या महिलेचा पाठलाग केला आहे.

कोरियन महिलेची छेड काढणाऱ्या तरुणांचा खार पोलिसांकडून शोध सुरू

मोबीन चंद मोहम्मद शेख आणि मोहम्मद नकीब सदरेलम अन्सारी या दोन तरुणांना लाइव्ह स्ट्रिमिंगदरम्यान एका कोरियन युट्यूबरचा विनयभंग केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. खार पोलिसांनी आयपीसी 354 अंतर्गत एफआयआर नोंदवला आणि दोघांनाही अटक केल्याचे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे.

व्हिडिओ प्रचंड व्हायरल: हे सर्व कोरियन महिला ऑनलाइन स्त्रिमिंग करत असताना रेकॉर्ड ही झाले आहे. कोरियन महिला सोबत झालेला सर्व प्रकार महिलेने सोशल मीडियावर टाकला आहे. महिलेसोबत झालेला सर्व प्रकाराचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. मुंबईच्या खार परिसरात हा सर्व प्रकार घडला आहे. आता या सर्व घटनेची पोलिसांकडून तपास सुरू झाला असून ती टवाळखोर पोर नेमकी कोण होती ? याचा शोध पोलीस घेतला मंगळवार रात्रीची ही घटना असून, या घटनेबाबत बुधवारी सायंकाळी पोलिसांनी तपास सुरू केला होता.

कोरियन महिलेची काढली छेड, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर दोघांना अटक

मुंबई पोलिसांना तो व्हिडिओ ट्विट: कोरियन महिलेने आपल्या सोबत झालेला घटनेचा तो व्हिडिओ सोशल मीडियावर टाकला मुंबईत राहणारा कोरियन महिलेच्या मुंबईतील एका फॉलोवर्सने तो व्हिडिओ मुंबई पोलिसांना ट्विट केला आहे. मुंबई पोलिसांना तो व्हिडिओ ट्विट केल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली आहेत, आणि त्या तरुणांचा शोध घ्यायला सुरू केला आहे. काही दिवसापूर्वी अंधेरी परिसरात एका टॅक्सी चालकाने अमेरिकन महिलेसोबत गैरवर्तन केले होते. त्यानंतर आता कोरियन महिलेसोबत मुंबईत छेड काढण्यात आली. मुंबईसारख्या सुरक्षित शहरात परदेशी महिला नागरिकांसोबत सातत्याने होणाऱ्या अशा घटनांना आवर घालण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.

Last Updated : Dec 1, 2022, 12:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details