महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

केरळचे डॉक्टर-नर्स सेव्हन हिल रुग्णालयात देणार रुग्णसेवा - Mumbai latest update

मुंबईत डॉक्टर-नर्सची कमतरता असल्याने राज्य सरकारने केरळकडे 50 डॉक्टर आणि 100 नर्सची मागणी केली होती. त्याला केरळने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यानुसार डॉक्टरर्स विदाऊट बॉर्डर्स या संस्थेने पुढाकार घेत मुंबईत रुग्णसेवा देण्यास इच्छुक असलेल्या डॉक्टर-नर्सची टीम बांधली आहे. यात सध्या 45 डॉक्टर आणि 82 नर्सचा समावेश आहे.

मुंबई न्यूज
मुंबई न्यूज

By

Published : May 30, 2020, 1:48 PM IST

मुंबई - मुंबईतील सेव्हन हिल रुग्णालयात केरळमधील दोन डॉक्टर शुक्रवारी दाखल झाले आहेत. हे डॉक्टर सध्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत. तर सोमवारी 45 डॉक्टर आणि 82 नर्सची टीम मुंबईत दाखल होणार आहे. ही टीम सेव्हन हिल रुग्णालयात रुग्णसेवा देणार असल्याची माहिती सुरेश काकणी, अतिरिक्त महानगर पालिका आयुक्त, यांनी दिली आहे.

मुंबई न्यूज
मुंबईत डॉक्टर-नर्सची कमतरता असल्याने राज्य सरकारने केरळकडे 50 डॉक्टर आणि 100 नर्सची मागणी केली होती. त्याला केरळने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यानुसार डॉक्टरर्स विदाऊट बॉर्डर्स या संस्थेने पुढाकार घेत मुंबईत रुग्णसेवा देण्यास इच्छुक असलेल्या डॉक्टर-नर्सची टीम बांधली आहे. यात सध्या 45 डॉक्टर आणि 82 नर्सचा समावेश आहे. ही टीम सोमवारी मुंबईत दाखल होणार आहे. तर या टीमचे नेतृत्व करणारे डॉ. संतोष कुमार आणि डॉ. साजेस काल कोचीवरून मुंबईत आले आहेत. आम्ही दोघे डॉक्टर आज सेव्हन हिलमध्ये कामाची पाहणी करत आहोत. तर आमची टीम मुंबईत येण्यासाठी सज्ज आहे, असे डॉ. संतोष कुमार यांनी 'ईटीव्ही भारत'ला सांगितले आहे.
मुंबई न्यूज
या दोन्ही डॉक्टरांचा मुक्काम पुढचे काही दिवस सेव्हन हिलला असणार असून ते पालिकेच्या डॉक्टरांना मदत करणार आहेत. तर सरकारने रेसकोर्ससाठी केरळवरून टीम मागवली होती. पण आता ही संपूर्ण टीम सेव्हन हिल रुग्णालयासाठीच काम करणार असल्याचे काकणी यांनी सांगितले आहे. तर ही टीम आल्यानंतर सेव्हन हिलवरील ताण कमी होईल. त्यानुसार सेव्हन हिलमधील काही डॉक्टर-नर्स, इतर पालिका रुग्णालयातील डॉक्टर-नर्स रेसकोर्स रुग्णालयात काम करतील, असेही त्यानी स्पष्ट केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details